Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाभळेश्वर येथे मद्यार्क बँरल असणारा ट्रक पकडण्याच्या 'एक्ससाईज'च्या कारवाईची खमंग चर्चा श्री' प्रेसनोटमध्ये त्या आरोपीच्या नावासमोर..

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे मद्यार्कचे ७ बँरल असणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाने पकडण्यात आला. या ट्रक चालक व अन्य एकास पकडून न्यायालयासमोर उभे केले असता, त्याना पोलीस कोठडी मिळाली. ही सर्व कारवाई झाली. पण या कारवाईत श्रीगोंद्याच्या एका पुढाऱ्याचे नाव पुढे आल्याने त्या पुढाऱ्याला वाचवण्यासाठी मोठा खटाटोप झाला असून, खरे वास्तव कागदावर आल्याचे नसल्याची खमंग चर्चा सुरु झाली आहे.या कारवाईत नगर-मनमाड रस्ते लगत बाळेश्वर शिवारात ७ बँलर , २४० लिटर मद्यार्क असणारी ट्रक (एम एच १८, एए ५५६८) असा वाहनासह २२,७५००० किंमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला. या ट्रकचा चालक इद्रसिंग गुलाब भिल (वय३८, रा.वाडी, ता.शिरपूर जि.धुळे) व चंदु अर्जुन वानखेडे (वय ४२, रा.आमोद, ता.शिरपूर, जि.धुळे) याना पकडण्यात आले. दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर उभे केले असता, त्या दोघांना पोलीस कोठडी मिळाली. बँलर मधील तो मद्यार्क हा कोणत्या स्वरूपाचा आहे, यासाठी नमुने तपासणीस पाठविण्यात आले आहेत. त्या तपासणीच्या अहवालावरून तपासाची पुढील दिशा ठरेल, असे राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाचे अधिकारी नवलकर यांनी सांगितले.
परंतु या कारवाईमध्ये श्रीगोंद्याच्या एका पुढाऱ्यांचा हात असून त्या ट्रकमध्ये दारू नसून अन्य रसायन होते, यात संबंधित राजकीय पुढाऱ्याचे नाव पुढे आल्याने त्यास वाचविण्याचे प्रयत्न अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 
यामुळे आता याप्रकरणाबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुर्वे यांच्याशी संपर्क साधला, असता ते म्हणाले याप्रकरणाची सखोल चौकशी करून, यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल. 
------
'श्री' प्रेसनोटमध्ये त्या आरोपीच्या नावासमोर..
अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बाभळेश्वर कारवाईच्या प्रेसनोटमध्ये चक्क आरोपीच्या नावाच्या प्रारंभी वाहन चालक श्री. इद्रसिंग गुलाब भिल असे आदरणीय म्हटले आहे. ही बाब आरोपी असणाऱ्या बाबत योग्य नाही. यामुळे ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्षून चालणार नाही.


Post a Comment

0 Comments