Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा परिषद शिक्षक राज्यस्तरीय अधिवेशन सुट्टीत व्हावे ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना जि.प.सदस्य राजेश परजणे यांचे पत्र


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षक राज्यस्तरीय अधिवेशन हे दि.९ ते १४ मार्चला न घेता सुट्टी कालावधीत घ्यावा, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी म्हटले आहे.
सहा दिवस आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाला आपला विरोध नाही, असे पत्रात श्री परजणे यांनी स्पष्ट केले आहे. अधिवेशन हे आँनड्युटीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. पण या काळात काही उपाययोजना करण्यात आल्या का? याबाबत बोध होत नाही. दिवाळीच्या सुट्टी दरम्यान अधिवेशन घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. तसेच शिक्षकांना निवांत वेळ देता येऊ शकतो. याबाबत राज्यस्तरीय संघटना मध्ये चर्चा करून शिक्षकांचे अधिवेशन दिवाळी सुट्टीत घेण्याबाबत विचार करावा. तसे झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळू शकते, असे पत्रात श्री. परजणे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments