Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवा सुरू ठेवावी-राजाराम माने


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नाशिक -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना ओपीडी बंद करण्याबाबत कोणत्याही सूचना नसून वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली सेवा सुरू ठेवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय यंत्रणा या कार्यात व्यस्त असताना खाजगी दवाखान्यातील ओपीडी बंद असल्यास त्याचा दबाव शासकीय आरोग्य यंत्रणेवर पडतो. स्वाभाविकपणे याचा परिणाम करोना विरोधातील उपाययोजनांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ओपीडी सुरू ठेऊन रुग्णांवर उपचार करावे. असे करताना रुग्णालयात एकाचवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. दोन रुग्णांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवावे. करोना सदृश लक्षणे रुग्णांमध्ये आढळल्यास त्याची माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहनही श्री.माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments