Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनेक संस्था, संघटना आणि उद्योग आस्थापना, जिल्हा प्रशासनाला मदतीसाठी उत्सुक ; समन्वयासाठी जिल्हा नियोजन अधिकारी यांची नियुक्ती


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.31- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा एकवटल्या असताना अनेक सामाजिक संघटना आणि उद्योग आस्थापनांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यांव्या सीएसआर फंडातून त्यांनी मदतीची तयारी दर्शविली आहे. याबाबतचे समन्वयन करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांची नियुक्ती केली आहे. अशा उद्योग आस्थापनांनी सीएसआर फंडातून कशा प्रकारची मदत करणार यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेला मदत करण्याची इच्छा अनेक उद्योग-आस्थापनांनी दर्शविली होती. यामध्ये सुनियोजितपणा यावा आणि कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जी मदत आवश्यक आहे, ती मिळावी, यादृष्टीने श्री. भदाणे समन्वय करतील. अधिक संपर्कासाठी श्री. भदाणे (मोबाईल क्र.७७३८३९४६२१) आणि सहायक नियोजन अधिकारी दीपक दातीर (मो. क्र. ९८३४९७३२७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments