Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कापूरवाडी तलावाचा गाळ काढण्यास अखेर रक्षा मंत्रालयाची परवानगी


खा. विखेंच्या पाठपुराव्याला यश
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कापूरवाडी तलावाचा गाळ काढण्यास अखेर रक्षा मंत्रालयाने दिली परवानगी
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
नगर तालुका तालुक्यातील कापूरवाडी' बुरानगर, भिंगार, नागरदेवळे , सारसनगर व परिसरातील बारा गावांच्यासाठी महत्त्वाचा असणारा कापूरवाडी तलाव गेल्या अनेक वर्षापासून लष्कराच्या ताब्यात होता. नगर तालुका व परिसराच्या पिण्याच्या व जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तलावातील गाळ काढण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून स्थानिक लष्करी प्रशासनाकडे प्रलंबित होती. स्वातंत्र्योत्तर काळापासून कापूरवाडी तलाव हा लष्कराच्या ताब्यात आहे . या तलावातून पूर्वी भुयारी पाइपलाइनद्वारे द्वारे लष्कराच्या घाटापर्यंत पूर्वी पाणी दिले जात होते. कापूरवाडी , नागरदेवळे, बुरानगर भिंगार आणि इतर बारा गावांसाठी पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची सोय सुद्धा या तलावातून पूर्वी होती. स्वातंत्र्यानंतर लष्कराच्या अखत्यारीत हा तलाव आला आला . यापूर्वी देखील लोकप्रतिनिधींनी व जनतेने वेगळा निवेदने देऊन सुद्धा रक्षा मंत्रालयाने मात्र याबाबत कधीही परवानगी दिलेली नव्हती! मात्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयाला या संदर्भात विस्तृत सादरीकरण केल्यानंतर रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्करी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देऊन कापूरवाडी तलावातील गाळ काढण्यास अखेर मान्यता दिली आहे अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दूरध्वनीद्वारे दिली. या संदर्भात नुकताच पत्रव्यवहार प्राप्त झाला असून परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रश्न अखेर मार्गी लागल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले . त्याचबरोबर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसाच्या लोक डाऊन नंतर या संदर्भात संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे व : लष्कर प्रशासनातील वरिष्ठांची बैठक घेऊन गाळ काढणे संदर्भात आवश्यक तो लोकसहभाग व इतर पूरक बाबींच्या पूर्ततेबाबत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तलावातील गाळ काढल्यानंतर परिसरातील भूजल पातळी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. साठवण तलावाची क्षमता वाढवून भविष्यातील पाणी पाणी टंचाईचा प्रश्न देखील निकाली निघणार आहे. गाळ काढण्यासाठी: स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग आणि प्रशासन ह्या सगळ्यांच्या एकत्रित सहभागाची सहभागासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा विखे पाटील यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले व कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान केले. अनेक वर्षापासून ची प्रलंबित असणारी ही मागणी लष्करी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील गेल्या पन्नास वर्षात याची दखल घेतली गेली नव्हती मात्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकारी लष्करी प्रशासन व रक्षामंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल . आज चैत्र पाडव्याच्या निमित्ताने खासदार डाँ. सुजय विखे पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी दिल्याने नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केल्याशिवाय राहणार नाही अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलकेली.

Post a Comment

0 Comments