Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाजगी दवाखाने आणि रुग्णालये सुरु ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश ; बंद ठेवल्यास नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविणार - जिल्हाधिकारी


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २७ - जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने, सर्व रुग्णालये तसेच सर्व मेडीकल दुकाने त्यांचे दैनंदिन वेळेनुसार सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. अशा आपत्कालिन परिस्थितीत जर खाजगी व्यावसायिक डॉक्टर यांनी दवाखाना बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सद्यपरिस्थितीत जिल्ह्यातील खाजगी दवाखाने, रुग्णालये आणि मेडीकल दुकाने सुरु राहणे आवश्यक आहे. आजारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी असा निर्णय आवश्यक असून त्यादृष्टीने कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, या वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात, दवाखान्यात होणारी गर्दी टाळावी, दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राहील, हे पाहावे, रुग्णांची दूरध्वनीद्वारे नोंदणी करावी तसेच एकावेळी एकाच रुग्णाला तपासणीसाठी बोलवावे, रुग्णांची तपासणी करताना ग्लोव्हज आणि मास्क वापरावेत, रुग्णांशी कमीत कमी संपर्क यावा, यासाठी रक्तदाब मोजणीसाठी डिजीटल रक्तदाब तपासणी यंत्र वापरावेत, रुग्णालयात येण्यापूर्वी रुग्णांना हात स्वच्छ धुवून येण्याबाबत सांगावे, प्रत्येक रुग्णाच्या तपासणीनंतर हात स्वच्छ धुवावेत, कोरोना संशयीत रुग्णास नजीकचे ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्याची दक्षता घ्यावी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments