Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरात कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - कोरोनाच्या पाश्वभूमीवर जमावबंदीचा आदेश असताना, सोमवारी (दि.२३) नगर शहरात कायद्याच्या उल्लघंन करणाऱ्या व कारणास्तव फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

 जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके ही सर्व अधिकारी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था पालन होते की, नाही. ज्या ठिकाणी पालन होते नाही, तेथे कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिल्या. सोमवारी शहरातील रस्त्यावर दुचाकीवरून येणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरु केल्या. शहरातील रस्त्यावर कारवाई सुरू होताच नागरिकांची धावपळ सुरू झाली.

Post a Comment

0 Comments