Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आतापर्यंत २०० पैकी १९६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव


पुण्याच्या एनआयव्ही संस्थेचा अहवाल
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर, दि. २२- जिल्ह्यात आतापर्यंत २६१ व्यक्तींची तपासणी करण्यातआली असून आज आणखी ०३ व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे तर २५६ व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. 

दरम्यान, यापैकी, २०० व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आली होते. त्यातील १९६ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. सध्या ०२ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. तर २ जण यापूर्वीच कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.        

Post a Comment

0 Comments