Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर येथे संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संस्थेतर्फे संवाद शिबिर संपन्न


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - संघटन शक्तीनेच संपादक पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक भावनेतून पत्रकारिता करणे ही सत्वपरीक्षा आहे. राज्यातील अनेक संपादक पत्रकार ही परीक्षा दररोज देत असतात आणि अन्यायाविरुद्ध लढत असतात, असे असले तरी संपादक पत्रकारांनाही संसार आहे. भवितव्य आहे आणि त्यासाठी त्यांनी किमान स्वावलंबी असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेचे अध्यक्ष किसन हासे यांनी केले.


अहमदनगर येथे संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संस्थेच्या अहमदनगर शाखेने आयोजित केलेल्या संपादक पत्रकार संवाद शिबिर प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे होते. संपादक करण नवले, शाखा कार्याध्यक्ष अॅड. दिपक मेढे, संस्थेचे समन्वयक नरेंद्र लचके, प्रकाश निसळ, विठ्ठल शिंदे, इरफान शेख, अशोक झोटिंग, विनायक झावरे, श्रीकांत मांढरे, विकास वाव्हळ, विजय येवले, बाबा ढाकणे, बाळकृष्ण गोरडे, अरविंद गाडेकर, मनोज साकी, सुयोग हांडे, संजय लाड यांचेसह उद्योजक नवनाथ धुमाळ, चंद्रकांत टेके, राजेंद्र गागरे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
श्री हासे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील संख्येने 90% असलेल्या या वृत्तपत्रांकडे, संपादक पत्रकारांकडे शासनाचे दुर्लक्ष होते तसेच काही प्रसंगी समाजाचेही दुर्लक्ष होते ही खेदाची बाब आहे, असे असले तरी संघटन शक्ती च्या जोरावर ग्रामीण भागातील वृत्तपत्रे मालक संपादक त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने समन्वय साधत आहेत, संघर्ष करत आहेत आणि प्रबोधनाची परंपरा पुढे चालवत आहेत. अशा प्रसंगी राज्यातील छोट्या वृत्तपत्रांच्या मालक संपादकांनी, भांडवलदार वृत्तपत्रांच्या संपादक पत्रकारांनी संघटित होऊन त्यांच्या भवितव्यासाठी स्वावलंबनासाठी संघटीत होणे महत्त्वाचे आहे. अनेक वृत्तपत्रे पात्र असूनही शासनमान्य यादीत नाहीत. अनेक संपादक पत्रकार पात्र असूनही त्यांना अधिस्वीकृती पत्र नाही. अनेक ज्येष्ठ संपादक 70 वर्षे वयमान असूनही त्यांना पेन्शन मिळत नाही. अनेक संपादक पत्रकारांना त्यांच्या आजारासाठी किंवा दुर्दैवाने अपघात झाल्यास शासकीय सहकार्य होत नाही. या आणि अशा सारख्या अशा अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी संपादक पत्रकारांनी आपले मतभेद बाजूला ठेवून तसेच अहंकार बाजूला ठेवून जी संघटना आणि संस्था सर्वांच्या भल्यासाठी काम करत असेल त्या संस्थेचे सदस्य झाले पाहिजे त्याचबरोबर एकमुखाने एक दिलाने शासनाशी संवाद करून आपले प्रश्न सोडवले पाहिजे असेही सडेतोड मत श्री हासे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
प्रास्ताविक दिपक मेढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील संपादक पत्रकारांसाठी संपादक व पत्रकार सेवा संघ जिद्दीने काम करीत आहे. हे यापुढे करीत राहील त्यासाठी सर्वांची साथ महत्त्वाची आहे असे विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले तसेच संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे आणि उपस्थित इतर मान्यवरांचा सत्कारही केला.
याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी आएनआय च्या अहवालासंबंधी अनेक अडचणी व्यक्त केल्या. वृत्तपत्राची पडताळणी तसेच जाहिरात धोरण संदर्भातही अनेक अडचणी व्यक्त केल्या. महाराष्ट्र सरकारने छोट्या वृत्तपत्रांना जाहिराती प्राधान्याने देण्यात याव्यात अशा अपेक्षाही व्यक्त केल्या. याप्रसंगी अॅड. संध्या मेढे, अॅड. सौ. मनिषा शिंदे आणि उद्योजक नवनाथ धुमाळ यांचाही सन्मान करण्यात आला. या संवाद शिबिरासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन जिल्हानिहाय वृत्तपत्र आणि संपादक पत्रकारांचे प्रश्न सोडविले जातील अशी खात्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकाश भंडारे यांनी पन्नास वर्षातील वृत्तपत्र सृष्टीच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच नगर जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारितेची माहिती दिली. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ असे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात प्रभावी संघटन उभे करू व शासनाशी संवाद साधून प्रसंगी संघर्ष करून न्याय मिळवून देऊ अशी भावना श्री भंडारे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड. संध्या मेढे यांनी केले.

Post a Comment

0 Comments