Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरी वाहनांचे बनावटीकरण करून विकणारी टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची महत्वपूर्ण कारवाईआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - चोरलेल्या वाहनांचे बनावटीकरण करून विक्री करणाऱ्या तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. अक्षय विठ्ठल जंगम (वय २०, रा.भोसले आखाडा, बुरुडगावरोड, अ.नगर), समिर खोजा शेख (रा.झारेकरगल्ली, अहमदनगर), गोरख भारत सुरवाडे (वय २१, शिवाजीनगर, कल्याणरोड, अहमदनगर) आदींना पकडण्यात आले आहेत.
याबाबत पोलीसकडून मिळालेली माहिती अशी की, घरासमोरुन दुचाकी चोरी गेल्याच्या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असता, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या गुन्ह्यातील आरोपी यांनी सदर दुचाकीचे बनावट पेपर बनवून ती दुचाकी विक्रीसाठी बुरुडगावरोड भोसले आखाडा परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सापळा लावून अक्षय जंगम याला गाडीसह पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, बनावट कागदपत्रे असल्याचे समोर आले. त्याने सदरची गाडी ही समिर शेख, गोरख सुरवाडे व बनावट कागदपत्रे तयार करण्यास आकाश अरुण दळवी (रा.लोंढे मळाजवळ, केडगाव, अहमदनगर) मदत केल्याची माहिती दिली.अन्य दोन आरोपींना अटक करून वेगवेगळ्या ठिकाणीहून चोरलेल्या गाड्या हस्तगत केल्या आहेत. 
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पो.नि.विकास वाघ, डिबी विभागाचे पो.उ.नि.सतिष शिरसाट, पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, भारत इंगळे, पोकाँ सुजय हिवाळे आदी च्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments