Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुऱ्हाणनगर रोड ते शुक्लेश्वर मंदिर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे बुऱ्हाणनगररोड ते शुक्लेश्वर मंदिर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. 

जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले.
यावेळी श्री झोडगे म्हणाले की, महाशिवरात्री व नवरात्री उत्सवाच्या दरम्यान सदर रस्त्यावर पायी जाणाऱ्या भक्तांची प्रचंड वर्दळ असते. पायी जाणाऱ्या भक्तांना खड्यामुळे व मुरुमाच्या खड्यांमुळे खुप त्रास होतो. पावसाळ्यात तर या रस्त्याने पायी चालणे मुश्किल होते, पण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर भक्तांना व जवळपासच्या धाडगे, रानमळकर, गोंधळे, झोडगे, रसाळ वस्ती तसेच भिंगारला जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची सोय होईल. 
यावेळी सरपंच राम पानमळकर, सा.बां वि शाखा अभियंता शिवाजी राऊत, ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे, शोभा गोंधळे, लोकेश मेहतानी, रविंद्र शिंदे, संदीप ताठे, कबीर शेख, अशोक ताठे, संदिप गुंड संतोष धिवर, अच्चुत गाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. 
दरम्यान, पाठपुरावा करुन या विकास कामासाठी निधी मिळून दिल्या बद्दल ग्रामपंचायत सदस्य शोभाताई गोंधळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने झोडगे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments