Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सर्व सेतू, महा ई सेवा, आधार केंद्र आता १४ एप्रिलपर्यंत बंद


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्‍हयातील सर्व सेतू, महा ई सेवा केंद्र, आधार केंद्र तसेच सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्‍त नोंदविण्‍याचे  कामकाज दि. 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते.  महाराष्‍ट्रातील लॉकडाऊन हे दि. 14 एप्रिल 2020 चे मध्‍यरात्री पर्यत लागू करण्‍यात आल्‍यामुळे  आता ही मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्‍हयातील ज्‍या नागरीकांना दाखले अत्‍यावश्‍यक आहेत. त्‍यांनी सदर दाखल्‍याकरीता आवश्‍यक लागणारी कागदपत्रे स्‍कॅन करुन संबंधीत कार्यालयाच्‍या ई-मेलवर पाठविण्‍यात यावीत. त्‍यामुळे सर्व नागरीकांना ऑनलाईन पध्‍दतीने दाखले वितरीत करण्‍यात येतील.
कोणतही व्‍यक्‍ती, संस्‍था व संघटनांनी  या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास  भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्‍या  कलम  188 नुसार दंडनिय  कायदेशीर  कारवाईस व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 व मुंबई  पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43(1) अन्‍वये कारवाईस पात्र राहतील असे  जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments