Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सध्याच्या परिस्थितीवर 'एप्रिल फूल' पाठविणारा व ग्रुप अँडमिनवर कारवाई होणार ! : शहर उपविभागीय अधिकारी संदिप मिटके


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर दि.३०- सध्याच्या आलेल्या कोरोना व्हायरस यासंदर्भात एप्रिल फूल केल्यास तसेच तो मेसेज सोशल मीडियावर टाकल्यास त्या संबंधितीसह ग्रुप अँडमिनवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, अशी माहिती नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली. 

येणाऱ्या दि.१ एप्रिल २०२० रोजी अनेकजण सध्याच्या परिस्थितीचे गांभिर्याची जाणीव ठेवून मित्र परिवार अथवा नातेवाईक यांना एप्रिल फूल करु नका. सध्याच्या परिस्थितीत आपल्यावर असणारे कोरोना व्हायरसचे संकट व संचारबंदी यामुळे कोरोना व्हायरसच्या बाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, असे कोणतेही मेसेज सोशल मीडियावर पाठवू किंवा टाकू नये. जेणेकरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही. तसा काही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास त्या संबंधितावर व त्या संबंधित ग्रुप अँडमिनवर कारवाई केली जाणार आहे, असे श्री मिटके यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments