Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भगवानगडाचा शिंगोरी येथील नारळी सप्ताह कार्यक्रम रद्द


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बोधेगाव - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचा ८७ वा फिरता नारळी सप्तहा मौजे शिंगोरी ता शेवगाव येथे दि ६ ते १३ एप्रिल रोजी संपन्न होणारा नारळी सप्ताहाचा कार्यक्रम करोना व्हायरल मुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे 
श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत संत भगवानबाबा यांनी गावोगावी फिरता नारळी सप्तहाची सुरवात केली नियमाप्रमाणे भाविक परंपरा प्रमाणे गावोगावी नारळी सप्तहाचे दरवर्षी नियोजन करतात भाविक लोकवर्गणीतून भव्यदिव्य प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमाचे भगवानगडाचे महंत डॉ नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा नुसार सालाबादप्रमाणे आयोजन केले जाते,यंदा ८७ वा नारळी सप्ताह मौजे शिंगोरी ता शेवगाव येथे दि ६ ते १३ एप्रिल रोजी संपन्न होणार होता त्या दृष्टीने ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून हा सप्ताह भव्यदिव्य पार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करून नियोजन सुरू केले होते तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नामांकित संत, महंत यांची कीर्तन, प्रवचना बरोबर आदी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक वातावरणामुळे प्रशासनाने साथीचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा निर्णय घेण्यात आला लोकगर्दी होऊ नये प्रयत्न सुरू आहे शाळा, महाविद्यालय यांना सुट्या देण्यात आल्या तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या यात्रा, धार्मिक, व सार्वजनिक उत्सव समारंभ रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेण्यात आल्याने पुढील नियोजित कार्यक्रम रद्द करन्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थ व नारळी सप्ताह कमिटीने दिली आहे.

Post a Comment

0 Comments