Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

... अखेर अकोले बसस्थानक येथे पाणपोईस प्रारंभ ; सिताराम पाटील गायकर प्रतिष्ठानचा पुढाकारआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अकोले : अनेक दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई व्हावी, अशी मागणी होती, अखेर याची दखल घेऊन सिताराम पाटील गायकर प्रतिष्ठानाने अकोले बसस्थानकात पाणपोईचा शुभारंभ केला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक बाळासाहेब ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आगार प्रमुख आव्हाड यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आवारी यांनी केले. आभार विठेचे माजी उपसरपंच सुशांत आवारी यांनी मानले.
यावेळी निंब्रळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गंगाराम नलावडे, शांताराम धुमाळ यांच्यासह प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते उपस्थितीत होते. 
ग्रामीण भागातील जनतेसाठी अकोले बसस्थानकात प्रवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक सामाजिक संघटनांनी यासाठी अकोल्याचे आगारप्रमुख यांच्याकडे मागणी केली. परंतु या सामाजिक मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. अकोले बसस्थानक म्हणजे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या बसस्थानकावर कोणत्याही सवलती मिळत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र पाण्यासारखे पूण्य कशातही नाही हा संदेश तरुणांच्या मनी उतरला व गाजावाजा न करता काल पाणपोई चा शुभारंभ झाला. हजारो तरुण,विद्यार्थी,वयोवुध्द नागरिक,महिलांनी लाभ घेऊन या उपक्रमाचे कौतुक केले. अकोले बसस्थानकावर पाणपोई सुरू झाली, यामुळे बिस्लरी मुक्त शुध्द पाणी देण्याचा संकल्प आहे. विविध या उपक्रमामुळे या प्रतिष्ठानची ओळख देवु असा संकल्प व्यक्त केला अनेकांना अकोले शहरात आल्यानंतर थंडगार पाणी पिण्यास मिळणार आहे. यातील अनेक तरुणांनी हा उपक्रम हाती घेऊन वेगळा संदेश दिला आहे. 

Post a Comment

0 Comments