Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

१३ मार्च पासून जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन


ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रम
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर :- शासनाचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. १३ व १४ मार्च २०२० असे सलग दोन दिवस जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, कवी संमेलन आदि भरगच्च साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रंथप्रेमी, साहित्य रसिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. मा. गाडेकर यांनी केले आहे.
येथील न्यू आर्टस्,कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात होणाऱ्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन दि. १३ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होत आहे. यावेळी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, महापौर बाबासाहेब वाकळे, जि.प.अध्यक्षा ना.सौ.राजश्रीताई घुले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खा. डॉ. सुजय विखे पा., खा. सदाशिव लोखंडे, आ.संग्राम जगताप, आ.डॉ सुधीर तांबे, आ. अरूण जगताप, आ.बबनराव पाचपुते, आ.राधाकृष्ण विखे पा., आ. मोनिकाताई राजळे, आ. लहू कानडे, आ. किरण लहामटे, आ. आशुतोष काळे, आ. निलेश लंके, आ. रोहित पवार, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, प्र.ग्रंथालय संचालक सु. हि. राठोड, नाशिक विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक क. सु. महाजन, माजी आ. नंदकुमार झावरे पा., जिल्हा मराठा शिक्षणसंस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चच्हाण, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, ज्येष्ठ कवि चंद्रकांत पालवे, गणेश भगत, डॉ. अमोल बागुल आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
तत्पुर्वी जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वा. अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळेरोड ते करविर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. ग्रंथ दिडीत जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे सर्व पदाधिकारी सहभागी होतील. दुपारी १२. ३० ते १.३० या वेळेत ग्रंथालय आणि वाचन संस्कृती या विषयावर न्यू आर्टस महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ लक्ष्मीकांत येळवंडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. कैलास दौंड, डॉ. गुंफा कोकाटे, डॉ. बापू चंदनशिवे, प्रा. डॉ. वैशाली भालसिंग, प्रा.डॉ. राजकुमार घुले, सौ. संगिता निमसे ,प्रा. रामदास टेकाळे आदि साहित्यिक सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, निवासी संपादक बाळ ज. बोठे, अनिरूध्द देवचक्के, सुधीर लंके, मिलिंद बेंडाळे, राजेंद्र झोंड, अनंत पाटील, विजयसिंह होलम, सुभाष गुंदेचा, महेंद्र कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, मिलिंद देखणे आदि विविध वृत्तपत्रांचे संपादक मंडळी सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. नवनाथ येठेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.
शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ज्येष्ठ कवि चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली व सिने गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन होईल. यामध्ये डॉ. लीला गोविलकर, गणेश मरकड, संजय बोरूडे, शर्मिला गोसावी, केशव भणगे, महेश महाराज देशपांडे, बाळासाहेब अरगडे, सतिश डेरेकर, ऋता ठाकुर,प्रा. ग.ल. भगत, प्रा. डॉ. स्मिता भुसे, एम.पी. दिवाण, दिलीप शहापूरकर, बाळासाहेब चव्हाण,प्रा. वृषाली जोंधळे, डॉ. क्रांतीकला अनभुले, बेबीताई गायकवाड, डॉ. कमर सरूर, अशोक निंबाळकर, स्वाती ठुबे, सुधीर पाठक, पंडित निंबाळकर, प्रमोद येवले, मनिषा पाटेकर, अशोक शर्मा, चंद्रकांत कर्डक, लक्ष्मीकांत लोणे, डॉ. राजेंद्र सिंह परदेशी, गंगाधर पंडित, स.गु. गोरे, अरविंद ब्राम्हणे, विशाखा गवळी, संदीप काळे, स्वाती पाटील, श्रावणी बोलगे, अशोक शिंदे, अर्चना डावखर, शरद धलपे, नवनाथ वाळके, सायली देशपांडे, प्रा. रामदास टेकाळे, डॉ.मच्छिंद्र मालुंजकर, अनिल चौधरी, सुभाष सोनवणे, रचना सुनिल गोसावी, राजु म्हस्के, सं. कुं.वाघचौरे,प्रा. शशिकांत शिंदे आदि कवि सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते १.३० या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांच्या
अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक जयंत येलुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथाने मला काय दिले ? या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये, प्रा. मेधा काळे, डॉ. सौ. सुधा कांकरिया, भूषण देशमुख, डॉ. संदिप सांगळे, भूपाली निसळ, प्राचार्य एम एम. तांबे, शब्बीर शेख, प्रा. गणेश भगत सहभागी होणार आहेत. त्यांनतर दुपारी ३ ते ४ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक व आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य भास्करराव झावरे, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख बाबासाहेब खराडे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, विश्वस्त मुकेश मुळे, साहित्यिक भाऊसाहेब सावंत आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. प्रत्येक कार्यक्रमाचे शेवटी वाचक गौरव प्रमाणपत्र वाटप करून कार्यक्रमाचा समारोप होईल. 
ग्रंथोत्सवाचे सर्व कार्यक्रम हे न्यू आर्टस् महाविद्यलायाच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात होतील. ग्रंथोत्सव यशस्वितेसाठी जिल्हा समन्वय समिती, जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी तसेच ग्रंथालय निरीक्षक संपत वाकचौरे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सलग दोन दिवसीय या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत सर्वांसाठी खुली राहील. यानिमित्त होणाऱ्या विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा वाचनप्रेमी, नगरकर व साहित्यिक, सांस्कृतिक रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.मा.गाडेकर यांनी केले आहे.  

Post a Comment

0 Comments