Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

31 मार्चपर्यंत पेट्रोल व डिझेल विक्री फक्त सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंतच करता येणार


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्टी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल विक्री ही दि.24 मार्च ते दि. 31 मार्च 20 20 या कालावधीत दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 या वेळेत सुरु राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राथरोग
प्रतिबंधात्मक कायादा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 नधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित
केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी है त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आदेश जारी करण्यात आले आहेत.  

Post a Comment

0 Comments