Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्याचे दर्शन !

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी दि.१४ - तालुक्यातील चिंचपूर पांगुळ, जोगेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता, बुधवारी रात्री जोगेवाडी येथील परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे नागरिकांनी प्रत्यक्षात पाहिल्याची माहिती दिली. या परिसरात कुत्रे मारल्याच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी या घटनेबाबत वनविभागाला माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments