Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रा. मा व विकास ज्योत उच्च मा. आश्रम शाळेस १०० ताट देणगी


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
पाथर्डी - शहरातील  व्यापारी सुरेश पटवा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक माध्यमिक व विकास ज्योत उच्च माध्यमिक आश्रम शाळेस  जेवणाचे १०० ताट देणगी  दिली.

श्री पटवा यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळेत ऊसतोड, वीटभट्टी मजूर, मेंढपाळ शेतमजूर गरीब वंचित घटकातील सुमारे 320 निवासी विद्यार्थी शिक्षण घेतात त्यापैकी काही काही विद्यार्थी अनाथ सुद्धा आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांशी श्री पटवा यांनी हितगुज साधले असता त्यांच्या चेहऱ्यावर मायेची उब मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट अशा झांज पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले व लेझीम व दांडिया नृत्य व विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी हे औचित्य साधून शिक्षण संस्थेच्या या पवित्र कार्यात आपला हातभार असावा, म्हणून त्यांनी खाऊ वाटप करून मुलांसाठी 100 जेवणाची ताटे दिली.
त्यांच्या या दातृत्वाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष अलकनंदा फुंदे तसेच सचिव राजेंद्र दौंड व शाळेचे मुख्याध्यापक संजय पालवे यांनी अभिनंदन केले.
श्री. पटवा यांनी अशाच प्रकारची मदत गरजूंना करण्याचा मनोदय व्यक्त करून समाजातील सधन व्यक्तींना सामाजिक कार्यात हातभार लावावा असे अवाहन केले.

Post a Comment

0 Comments