आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - राहाता तालुक्यातील लोणी येथील गोळीबार व हत्या प्रकरणातील आरोपी उमेश भानुदास नागरे (वय३३, रा.लोणी बु।। ता.राहाता) याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. याप्रकरणातील ४ आरोपींना पकडण्यात आले आहे.
फरार आरोपी उमेश नागरे हा सावरगाव, ( ता.काटोला,जि.नागापूर) येथे मित्राकडे राहात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली, त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदिप पाटील, शिरिषकुमार देशमुख, सफौ सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ हिंगडे, सुनील चव्हाण, आण्णा पवार, संदिप कर्डिले, संदिप दरंदले, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments