Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजे यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा


डॉ.राहुल पंडित, इंजि.रंगनाथ भोंडवे, वसंत दातीर, पत्रकार कुणाल जायकर, प्रा.चंद्रकांत वाव्हळ, युवराज खटके, सुरेश शेंडगे, शरद बाचकर, उत्तर प्रदेशच्या लक्ष्मी धनगर यांच्या नावाची घोषणा

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : येथील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर संस्कारमय प्रतिष्ठानच्या वतीने राजे मल्हारराव होळकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, शिक्षण, पत्रकार, आदर्श महिला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरव करण्याचा मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट महारनवर यांनी व्यक्त केला असून, यावर्षीच्या पुरस्कारार्थीमधे येथील पंडित अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ.राहुल पंडित,पुणे येथे कार्यरत असलेले महानिर्मितीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) .

इंजि.रंगनाथ भोंडवे, बीएसएनलचे अभियंता वसंत दातीर, टिव्ही 9 मराठी न्यूज चॅनेलचे कुणाल जायकर, न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्रा.चंद्रकांत वाव्हळ, उद्योगपती शरद बाचकर, पुणे येथील अहिल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शेंडगे, उत्तर प्रदेशच्या लक्ष्मी धनगर व युवराज खटके यांच्या पुरस्कारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून, पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.1 मार्च रोजी सकाळी 11.30 वा. येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे होणार आहे. या कार्यक्रमास इंदोर येथील होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर उपस्थित राहणार असून, कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाचे महासंचालक मंगेश देशमुख, माजी मंत्री प्रा.राम शिंदे, बाळासाहेब दोडतले, खा.डॉ.सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, आ.नारायण आबा पाटील, आ.बाळासाहेब आजबे, अनिल गोटे, रामहरी रूपनर, माजी जि.प.अध्यक्ष डॉ.शिवाजीराव राऊत, प्रसिद्ध उद्योगपती उत्तम सरगर, माजी नगरसेवक दिगंबर ढवण, कलावती शेळके, धनराज कोपनर, दादाभाऊ चितळकर, आण्णासाहेब बाचकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव वैशालीताई पिसाळ यांनी दिली.
तरी या दिमाखदार सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पोपट महारनवर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments