Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोकसहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे आरोग्य शिक्षण कार्यात चित्रपटाला माध्यमाचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते आरोग्यदायी समाजासाठी कला प्रबोधन चित्रपट, माहितीपट, व टीवी स्पाँट याचा माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी चित्रपट निर्माते विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रातील घटक यांच्या सहभागानेच चित्रपट महोत्सव दि. २९ फेब्रुवारीला शनिवार रोजी नॅशनल फिल्म अकॅडमी ऑफ इंडिया लॉ कॉलेज रोड पुणे येथे आयोजन केलेला आहे. हे या महोत्सव व स्पर्धासाठी महाराष्ट्रात चांगल्या प्रतिसाद मिळाला असून राज्यातील विविध भागातून एकूण 122 स्पर्धकांनी आपले आरोग्य विषयक माहितीपट टीवी स्पाँट सादर केलेले आहेत. त्यापैकी 48 स्क्रीनिंगसाठी निवड करण्यात आलेली आहे. यातील 16 स्पर्धकांना रोख बक्षिसे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे या महाआरोग्य चित्रपट महोत्सवामुळे आरोग्य व प्रतिबंधात्मक ज्ञान योजना पोचण्यासाठी मदत होणार असून गावपातळीपर्यंत या चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे आपले आरोग्य ही जबाबदारी या विषयावर प्रबोधन करण्यात माध्यमांनी नक्कीच उपयोगी ठरणार आहे चित्रपट महोत्सव सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत निवडलेले चित्रपट दाखवले जाणार असून दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत विजेत्या स्पर्धक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असून या महोत्सव स्पर्धेसाठी उपस्थित रहावे असे आव्हान राज्य शिक्षण व संपर्क विभागातर्फे करण्यात येणार येत आहे.

Post a Comment

0 Comments