Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आज "मराठी राजभाषा दिना" निमित्त नक्की पहा..छत्रपती शंभुराजेंच्या आद्य - अक्षरातून निर्माण होतोय मराठी शब्दकोष


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
आज "मराठी राजभाषा दिना" निमित्त पाहू शंभु-शब्दकोष, गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने शंभुसेना सामाजिक संघटनेची स्थापना झाली, अनं तेव्हापासुन अवघ्या महाराष्ट्राभर छत्रपती शंभुराजांच्या आदरार्थी उच्चारातून तेजस्वी जीवनावर, बलाढ्य शौर्यावर, आणि कणखर कर्तुत्वावर, व दुर्लक्षित इतिहासावर जनजागृती प्रबोधन अभियान सुरु केल्याने,वारंवार, सातत्याने शंभुशब्द-प्रयोगाचा व्यवहारात वापर झाल्याने प्रत्येकाच्या मना-मनावर हे शंभु-शब्द बिंबवले गेले आहेत. पाहता पाहता आज महाराष्ट्रातील अनेक शंभुभक्त, शंभुसैनिकही आपल्या बोलण्यातुन, वाण्यातुन तसेच लिहिण्यातुन या शंभु-शब्दांचा सारखा सारखा उल्लेखातुन वापर करताना दिसुन येत आहे. त्यामुळे ही बाब अभिमानास्पद असून एकप्रकारे मराठी शब्दकोषच निर्माण झला असल्याची माहिती शंभुसेना संघटनेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत शिर्के यांनी दिली.

सार्थ अभिमानाने शब्द उच्चाताना खालील असंख्य शंभु- शब्द आवर्जून उल्लेख करता येतील त्यात प्रामुख्याने जय शंभुराजे.. शंभुचरणी, शंभुमूजरा, शंभुगंध, शंभुश्री, शंभुसैनिक, शंभुभक्त, शंभुतिर्थ, शंभुक्षेत्र, शंभुवीर, शंभुमय, शंभुकालीन, शंभुकार्य, शंभुस्थळ, शंभुश्रद्धा, शंभुस्वरुप, शंभुशपथ, शंभुसरकार, शंभुसेवा, शंभुप्रभात, शंभुरात्री, शंभुसंध्या, शंभुप्रेमी, शंभुप्रेम, शंभुतेज, शंभुपुत्र, शंभुछत्र ,शंभुसंदेश, शंभुआदर्श, शंभुकन्या, शंभुविचार, शंभुस्वप्न, शंभुध्यास, शंभुवेध, शंभुमित्र, शंभुसंघर्ष, शंभुनिष्ठा, शंभुराष्ट्र, शंभुमार्ग, शंभुसत्ता, शंभुशासन, शंभुदूत, शंभुघोष, शंभुस्वराज्य, शंभुदुर्ग, शंभुनिती, शंभुकावा, शंभुलढा, शंभुप्रेरणा, शंभुभिमान, शंभुगर्व, शंभुशक्ती, शंभुभक्ती, शंभुजोश, शंभुसंकल्प, शंभुश्रेष्ठ, शंभुग्रंथ, शंभुतंत्र, शंभुयुक्ती, शंभुआदेश, शंभुसंस्कार, शंभुदृष्टी, शंभुआचरण, शंभुशौर्य, शंभुमंच, शंभुव्यख्याते, शंभुवक्ता, शंभुशाहीर, शंभुमहात्म्य, शंभुशाहिरी, शंभुराज्य, शंभुश्रोता, शंभुचरित्र, शंभुकाव्य, शंभुगीत, शंभुगाथा, शंभुकथा, शंभुत्याग, शंभुबलिदान, शंभुसमाधी…
अशा अनेक वीर-रस निर्माण करणाऱ्या व शंभुराजांच्या अभिमानास्पद वाटणाऱ्या नवीन मराठी शब्दांची, शब्दसंग्रहात म्हणजेच शब्दकोषात भर पडली असल्याने सर्वांनी या शब्दांचा रोजच्या वागण्या..बोलण्यात..
लिहिण्यात..अथवा प्रत्यक्ष हे शब्द भाषेत बोलताना वापर करावेत आम्ही तर अभिमानाने शंभु-शब्दांचा वापर करतोय, योगा योग म्हणजे आज 27 फेब्रुवारी रोजी “मराठी राजभाषा दिन” आला असून या दिवशी शंभुराजांचा राष्ट्रधर्मनिष्ठा स्वभिमान दिवस म्हणजेच “धर्मवीर दिन” आला असल्याने आज पासूनच मराठी शंभु-शब्दकोष वापरण्याचा प्रारंभ करावा अशी माहिती शंभुसेना संघटनेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत शिर्के यांनी दिली. सर्व शंभुभक्त व शंभुसैनिकांना शंभुसेना संघटनेच्या वतीने जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या शंभुमय भगव्या शुभेच्छा..!

Post a Comment

0 Comments