Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार परिसरातील नाले एक्सपायरीडेट बिअर बाटल्याने भरले ! ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - स्वच्छता व प्लास्टिक बंदी असताना भिंगार परिसरातील नाले एक्सपायरीडेट बिअर बाटल्याने व अन्य प्लास्टिक बाटल्याने भरल्यावस्थेत आहेत. 
वास्तविक पाहता सध्या प्लास्टिक बंदी असतानाही पपिंगस्टेशनजवळील धबदबी नाल्यासह परिसरातील अन्य नाल्यामध्ये हीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. स्वच्छता मोहिम या परिस्थितीमुळे बारगळ्याचे चित्र भिंगारसह नागरदेवळे ग्रामपंचायत परिसरात आहे.


 नाल्यातील या एक्सपायरी डेट भरलेल्या बिअर बाटल्या खेळण्यासाठी लहान मुले घेत आहेत. यात या बाटल्या लहान मुलांनी चुकुन पिल्यास आरोग्यास हानीकारक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती पपिंगस्टेशन धबदबी, भिंगारनाला व भुईकोट किल्ला परिसर आणि इतर ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. या घटनेची भिंगार कँन्टोन्मेंट व नागरदेवळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments