Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात - अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या.
जिल्हा उद्योग मित्र समिती सभा साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर तसेच समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, औद्योगिक क्षेत्रासाठी आरोग्य, वीज, पाणी तसेच अंतर्गत रस्ते, फायर फायटिंग आदी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्याव्यात. महिला कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत रस्त्यांवर बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. कामगारांच्या दवाखान्यात (ईएसआय) त्यांना मोफत आरोग्य सुविधा द्यावी, असेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये बस थांब्याचे अंतर अधिक आहे. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी सकाळी व सायंकाळी कंपनीची शिफ्ट सुटण्याच्या वेळी एमआयडीसी च्या अंतर्गत रस्त्यांवर पीएमपीएमएल च्या बसेस तात्काळ सुरु कराव्यात, अशा सूचना यावेळी अविनाश हदगल यांनी दिल्या.
एमआयडीसी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित करण्यात येवू नये, या परिसरातील रस्त्यांची व अंतर्गत रस्त्यांची कामे जलदगतीने करावीत, कामगारांना ईएसआयसी दवाखान्यात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बीएसएनएल व इंटरनेट सुविधा पुरवावी, पाणीपुरवठा करावा, फायर फायटिंग स्टेशन उभारावे, आदी मागण्या समिती सदस्यांनी मांडल्या.

Post a Comment

0 Comments