Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेंडी विद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये यश


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- चालू शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल, शेंडी विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
 शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला स्पर्धेत शेंडी विद्यालयाचा निकाल 98 टक्के लागला असून या परीक्षेत 91 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. याचा फायदा दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी होणार आहे. एनएमएमएस परीक्षेतही या विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत 5 वी ते 8 वी या सर्व वर्गांचा निकाल 100% लागला. भास्कराचार्य परीक्षेतही या विद्यालयाने मोठे यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती, ज्ञांनवर्धिनी, एनटीएस परीक्षेतही विद्यालयीन विद्यार्थी घवघवीत यश संपादन करतील अशी अपेक्षा मुख्याध्यापक कांडेकर बी. डी. यांनी व्यक्त केली.
 यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कांडेकर बी. डी., पर्यवेक्षक गोबरे व्ही. एच., शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना म्हस्के एम. ए., शेख एन.एम. एकलहरे एस. जे., दरे एस. यु. यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments