Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांना राज्य निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जाहीर


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये निवडणुकीचे संचलन तसेच आदर्श आचारसंहितेचे संदर्भात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्य निवडणुक आयोगाकडुन नेवासा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांनी उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१९ ची निवडणुक निर्भय, मुक्त व पारदर्शी वातावरणात पार पडली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी त्याच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार देवून सन्माननीत करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता.
राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्या या अभिनव संकल्पनेचा एक भाग म्हणून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संचलन व कार्यान्वयन यासाठी पहिल्यांदाच उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येत आहेत, त्यामुळे निवडणूक विभागात काम करणाऱ्या राज्यातील सर्व अधिकारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्हा निवडणूक विषयक कामकाजात गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात अग्रेसर आहे, गेल्या काही वर्षात उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून अरुण आनंदकर, कुंदनकुमार सोनवणे, सुनील माळी यांच्या काळात अहमदनगर जिल्ह्याची निवडणूक शाखा निवडणूक विषयक कामकाजात राज्यात अव्वल ठरला आहे, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय सामान्य प्रशासन विभाग, यांचेकडुन दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी पुरस्कारासाठी निवड झालेल्या विधानसभा मतदार संघ निहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments