Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नाशिक महानगर नूतन कार्यकारिणीची घोषणा


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नाशिक :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नाशिक महानगर नूतन कार्यकारिणीची घोषणा संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी केली.
येथील गरुडझेप अकॅडमी येथे आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सल्लागार प्रमोद दंडगव्हाळ, शहराध्यक्ष दिलीप कोठावदे, जेष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे, तालुका अध्यक्ष जगदिश सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण डोळस,जिल्हा उपाध्यक्ष पदी संदिप सोनवणे यांची निवड करण्यात आली. शहर कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष दिगंबर शहाणे (देशदूत, ना.रोड), सरचिटणीस राजेंद्र बच्छाव (सकाळ,इंदिरानगर) खजिनदार गोकुळ सोनवणे (लोकमत, सातपूर), कार्याध्यक्ष रामदास नागवंशी (भ्रमर,शहर), यांची निवड करण्यात आली असून कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण आहेर (एम एच १५ न्यूज,नवीन नाशिक),सतीश नांदोडे,(पुण्यनगरी,अंबड), समशाद पठाण(लोकमत,गंगापूर रोड),श्रीधर गायधनी(आपलं महानगर,दे.कॅम्प),बाबासाहेब गोसावी (लोकमत,विल्हाळी),योगेश मोरे (सकाळ,पंचवटी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
याशिवाय नाशिक तालुका अध्यक्षपदी जगदिश सोनवणे व कार्याध्यक्षपदी बाबासाहेब खरोटे यांची फेरनिवड करण्यात आल्याची घोषणा आरोटे यांनी केली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नवीन कार्यकारणी निवडीसाठी रविवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याचा विस्तार तसेच पत्रकारांच्या संरक्षण, आरोग्य व हितसंवर्धनासाठीच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
शहराध्यक्ष दिलीप कोठावदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संघाच्या आगामी उपक्रमांविषयीची माहिती दिली. तर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डोळस यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पत्रकार संघाचा कार्यविस्तार करून प्रत्येक तालुक्यासाठी कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब खरोटे यांनी तर आभार प्रदर्शन गोकुळ सोनवणे यांनी केले. यावेळी पत्रकार राजेश जाधव,निशिकांत पाटील, सोमनाथ जगताप यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments