Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी देवस्थानावर आ.रोहित पवार यांची वर्णी?

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्ष पदासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची वर्णी लागणार आहे, अशी चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.
शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांचा कालावधी काही दिवसापूर्वी संपुष्टात आला आहे. त्यात आत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. परंतु या सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा अंकुश आहे, असे म्हटले जाते. या परिस्थितीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहात तिन्ही मंत्रीपदे उत्तरेत आहेत. यामुळे दक्षिणेकडे नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिर्डी देवस्थानावर दक्षिणेकडे राज्य सरकार देईलच, अशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते मध्ये खलबते सुरु झाले आहे. शिर्डी संस्थानवर अध्यक्ष व विश्वस्तांची निवड व्हावी, अशी मागणी ही सुरू झाली आहे. या मागणीची राज्य शासनाने दखल घेतली असून, शिर्डी संस्थानच्या अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातून आमदार रोहित पवार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चेत आले आहे. वास्तविक आ.पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यास हा विखे घरण्याला मोठा झटका असेल. यामुळे आता राज्यातील सर्व च पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेचे शिर्डी संस्थांच्या अध्यक्ष व विश्वस्त पदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments