Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपतींचे नातेवाईक शिर्के घराण्याचा इतिहास चुकीच्या पद्धतीने प्रसारीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे : सध्याच्या मोबईल व कॉम्पुटर युगात युट्यूब चॅनेल,व्यक्तिगत फेसबुक आकौंट,

विविध ग्रुप ,अनेक पेज,असंख्य वॉट्सअप ग्रुपचे एडमिन ,तसेच सोशियल मिडिया, टीव्ही चॅनेलसह विविध स्वयंघोषित बुद्धिभ्रष्ट लेखकांकडून ऐतिहासिक शिर्के घराण्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने इतिहासाचा प्रचार-प्रसार करत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांंवर थेट कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मौजे पेड़गाव, तालुका श्रीगोंदा येथील किल्ले बहादुरगडचे (धर्मवीरगड) ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना संघटना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी दिली.
शिव-शंभुकाळातील छत्रपती शंभुराजांच्या वास्तव आणि संशोधित इतिहासाची सोनेरी पाने जगासमोर उलगडत असतानाच शिव-शंभुराजांवरील अनेक चुकीच्या इतिहासाचे आक्षेप खंडन होताना दिसत असून बऱ्याच बाबी उलगड़ने बाकी आहेत. त्याशिवाय छत्रपतींच्या जवळील अनेक नातेवाईकांपैकी शंभुराजांचे सख्खे मेहुणे व छत्रपतींचे जावई स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्या सह म्हणजेच शिर्के घराण्यांचे इतर अन्य काल्पनिक पात्र घुसडून चुकीचा इतिहास दाखवत आहेत,त्याबाबत असणाऱ्या खोट्या कलंकित इतिहासाचेही आता आक्षेप खंडन झाले असून त्याबाबत अनेक भक्कम पुरावे उपलब्ध आहेत तसेच महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख खात्याने तसे निर्दोष पत्र जाहिर केले आहे तरी देखील अनेक बुद्धिभ्रष्ट स्वयंघोषित लेखक मंडळी चुकीचा इतिहास पसरवत असल्यामुळे अनेक राजघराण्यांचे वंशज मंडळी आता जागृत झाली आहे त्यानुसार शंभुसेना संघटना, समस्त राजे-शिर्के वंशज घराणे, राजे-भोसले घराण्यांसह इतर ऐतिहासिक नातेवाईक घराण्यांनी एकत्र येत कायद्याच्या आभ्यासु सल्लागारांमार्फ़त कायदेशीर मार्गदर्शना नुसार चुकीचा इतिहास प्रसारीत करणाऱ्यांवर संबंधित (लोकांना) सोशियल मीडिया तसेच नेटकऱ्यांंना वकिलांमार्फत नोटीसा पाठवत गुन्हा दाखल करण्याबाबत निश्चित करण्यात असल्याने आता लवकरच इतिहासाची मोड़तोड़ करणाऱ्या व इतिहासा संदर्भात सोशियल मिडियातील चुकीच्या पोस्ट शेयर करणाऱ्या स्वयंघोषित इतिहासकारांना चांगलाच चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.
शंभुसेना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के हे भारतीय लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झालेले व्यक्तिमत्व असून त्यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सध्या समाजसेवा करण्याचे व्रत स्विकारले आहे. त्याचबरोबर चुकीच्या इतिहासाचेही अक्षेप खंडन करण्याचा त्यांचा मानस आहे, त्यासंदर्भात अनेक ऐतिहासिक पुरावे व गणोजीराजे शिर्के बाबत कलंकित इतिहासाचे उल्लेख आढळत नसल्याचे महाराष्ट्र पुराभिलेख खात्याचे पत्रही पुरावा म्हणून जाहिर केले असल्याने वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचे ही महाराणी येसुबाईंचे माहेरकडील ऐतिहासिक घराण्याचे वंशज शंभुसेना प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी बोलून दाखविल्याने आता तोतया लेखकांना संबंधित बोगस,फालतु पोस्ट डिलीट करण्याशिवाय पर्याय नाही.
शंभुसेना संघटना, समस्त शिर्के घराणे व शिव-शंभुभक्त लवकरच फ़िल्म सेन्सॉर डिपार्टमेंट,नाटक निर्मिती मंडळ, तसेच चित्रपट महमंडळ यांनाही शिर्के घराण्या संदर्भात तसेच गणोजीराजे शिर्के यांचे जीवन चरित्र म्हणजेच इतिहास चुकीचा दाखवु नये, याबाबत विनंती वजा इशारा देणारे पत्र देणार असल्याने स्वयंघोषित बुद्धिभ्रष्ट लेखकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments