Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अमोल भांबरकर यांना शांतिदूत परिवारातर्फे महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार जाहीर


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अमोल भांबरकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक भान जपत सामाजिक सेवेसाठी समाजात नवं चैतन्य निर्माण केले.तसेच भारतीय संस्कृतीचा उज्वल वारसा जतन करणारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रेस फोटोग्राफर तथा विश्वहिंदु परिषदेचे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर यांना पुणे येथील शांतिदूत परिवारातर्फे महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.  
पुरस्कार पुणे येथील युनिटी हॉस्पिटल औन्ध येथे १ मार्च रोजी देण्यात येणार आहे. दत्तात्रय कोहिनकर, शाम देशपांडे (आय.ए.एस), व्यंकटरावजी गायकवाड {अति.मुख्य.सचिव जलसंधारण (से.नि)}प्राचार्य कैलास बवले, शांतिदूत परिवार मार्गदर्शक विठ्ठल जाधव, अध्यक्ष सौ.विद्याताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. पुरस्काराबद्दल विश्वहिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवाप्रमुख दादा ढवाण,प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,प्रांतसेवा सहप्रमुख डॉ.प्रदीप उगले,प्रांतप्रचार प्रसिद्धी सह प्रमुख विवेक सोनक,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंगदलाचे अध्यक्ष गौतम कराळे आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments