Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपती संभाजीमहाराजांच्या सुटकेसाठी शिर्के घराण्याचा शेवटपर्यंत अलौकिक धाडसी प्रयत्न


ऐतिहासिक शिर्के घराण्यांचा आडनाव बदलाचा वास्तव इतिहास
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
👉स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोड, प्रेमळ व कणखर नात्यातील कलंकित दोषाचे निवारण झाले असून त्यासंदर्भात आणखी बरीच काही वस्तुस्थिती सह, परिस्थितिजन्य म्हणजेच प्रत्यक्षदर्शी जिवंत पुराव्यानुसार महत्वाची पूरक माहिती शेकडो वर्षापुर्वीपासून उपलब्ध असताना काही समाजकंटक लेखकांनी ध.. चा.. मा..आणि पराचा.. कावळा.. करुन आवर्जून शिर्के घराण्यांचा कर्तुत्वान वास्तव इतिहास समाजासमोर न आणता बुद्धिभ्रष्ट लेखकांनी छत्रपतींच्या जवळच्या नातेवाईकांनाच आवर्जून कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खालील प्रत्यक्षदर्शी वास्तव माहितीमुळे संबंधितांचे  कपट- कल्पित मनसूबे पर्दाफाश झाले आहेत.
       कोकणातील संगमेश्वर येथे अचानक घनघोर युद्ध सुरु झाले  असताना त्याप्रसंगी छत्रपती संभाजीराजांसह अनेक राजेशिर्के मंडळी व सैन्यांनी तीव्र लढा दिला होता परंतु दुर्दैवाने त्यावेळी छत्रपती शंभुराजेंसह शिर्के लोकांना व विविध अड़नावांच्या लोकांना अटक झाल्यानंतर सर्वांनांच औरंगजेबाचा सरदार मुक़र्रबखान नेमके कुठे घेऊन जातो यांची खबर- बातमी म्हणजेच कानोसा मिळविण्याकामी कुलमुखत्यार महाराणी येसुबाईसाहेबांनी माहेरच्या जवळील मंडळींना म्हणजेच आपले सख्खे भाऊ गणोजीराव शिर्के इतर बंधूंसह पित्यास स्वराज्यनिष्ठावंत पिलाजीराव शिर्के यांना सांगितल्यानुसार, शंभुराजांना घेऊन गेलेल्या मार्गाचा-माग काढत जाऊन वेळप्रसंगी मोघलांच्या विरोधात तीव्र प्रतिकार करण्यास सांगितले होते अगदी त्याप्रमाणेच गणोजीराजेंसह त्यांचे इतर तिन्ही बंधु म्हणजेच पिलाजीराव यांचे शूरवीर मुले वाघोजीराव,
गणोजीराव, संभाजीराव, देवजीराजे ही चारही मुले व इतरही असंख्य राजेशिर्के मंडळी व इतर हजारो सैन्य घेऊन आपल्या जावयास/मेहुण्यास मदत करण्यास गेले असताना त्यावेळेच्या बिकट परिस्तिथिनुसार गणोजीराजे शिर्के यांनी प्राचीन गामिनी कावा वापरत मोघलांच्या छावणीत ठीक-ठिकाणी अनेकांना वेशांतर करुन तसेच थेट प्रवेश करत मोठे नियोजन केले होते परंतु त्यात विविधप्रकारे विघ्ने, अडचणी आल्या होत्या, त्यातील काही अडचणी व त्यातून काढलेले गामिनी कावा मार्ग खालील प्रमाणे सांगता येतील.
          संगमेश्वर ते पेडगाव येथील किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड )
मार्गामध्ये काही राजेशिर्के मंडळी पकडली गेली असल्याने त्यांनी "गामिनी कावा" वापरत आपली आडनावे वेगळी- वेगळी सांगून आपल्या सुटका करुन घेतल्या होत्या म्हणुन त्यासर्व राजेशिर्के घराण्यांचे आजही रिकामे, पडवळ, कुंभारकर, पापळ सह अन्य विविध वेगवेगळी आडनावे पडलेली दिसत आहेत त्या मंडळीचे वंशज आजही गावो-गावी जिवंत आहेत तर काही राजेशिर्के मंडळीनी विविध जातीवर्णीय व्यावसायीकांचे वेशांतर करुन म्हणजेच कोण नाभिक बनून, कोण मंदिरात गुरव अथवा पुजारी होऊन, पालखीचे भोई बनून, काही पाणी देणारे पखाले होऊन, तर कोण कुंभाराचे साहित्य विकणारे बनून इतरही अन्य व्यावसायिकांचे वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत प्रवेश केला होता. 
 तसेच फक्त कोकणातच दिसणारा शिर्के घराणा आजही कोकणातील शृंगारपूर पासून- संगमेश्वर- पेड़गावचा किल्ला बहादुरगड (धर्मवीरगड)- तुळापुर- वढु-बुद्रुक पर्यंतच्या मार्गावर तसेच किल्ले बहादुरगडाच्या तटबंधी लगत, बहादुरगड परिसरात तसेच  25-30 किलोमीटर अंतरावर म्हणजेच श्रीगोंदा तालुक्यात शिर्के घराण्यांच्या त्याकाळच्या छावण्या आढळतात, ( म्हणजे आजची शिर्के घराण्यांची संपूर्ण गावच अस्तित्वात आहेत. ) पेडगाव मध्येही बहादूरगडा नजीक आजदेखील काही स्थायिक शिर्के घराणे आढळतात आणि हे शिर्के घराणे मोगलांना न डगमागता शिर्के आडनाव कायम ठेऊन बहादुरगडावर नजर ठेऊन होते. त्याप्रसंगी काही शिर्के मंडळींना वेशांतर करुन गडामध्ये प्रवेश करत असताना अनेकांना बलिदानही द्यावे लागल होते. त्यांचे पूर्वज आजही या परिसरात प्रत्यक्ष जीवन जगताना दिसत आहेत तेव्हा पासून शिर्के घराणे अवघ्या महाराष्ट्रातभर विखुरलेले दिसत आहे.
         तर काही राजेशिर्के मंडळींना गामिनी कावा करत असताना पकडल्याने मोघलांनी त्यांचे हात पाय कलम करुन त्यांना अपंग करुन सोडून दिले होते म्हणजे "थिट" करुन सोडून दिले म्हणुन त्यांचे आजही "थिटे" असे अड़नाव पडले आहे.. तसेच तुळापुर येथे छत्रपती संभाजीराजांचा छळ करत शरीराचे तुकड़े करुन मारल्यानंतर...त्याप्रसंगी औरंगजेबासमोर प्रतिकार करणे शक्य झाले नसल्यामुळे हतबल झालेल्या लोकांनी आपल्या राजांचे अवयव गोळा केले होते म्हणून काहींचे "वेचले" असे आडनाव पडले तर काहींनी अवयव शिवून एकत्र जोडले म्हणुन त्यांचे "शिवले" असे आडनाव पडले.. म्हणूनच तुळापुर येथील शंभुराजांच्या "बलिदान स्थळ" परिसरात व वढु- बुद्रुक येथील शंभुराजांचे "समाधी स्थळ" परिसरात आजही आमची आडनावे पूर्वी "शिर्के" असे होते असे अभिमानाने सांगणारी असंख्य मंडळी आढळतात.

      स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के यांच्या घराण्याविषयक थोडक्यात महत्वाची माहिती
                               |
                               |
                   #वाघोजी #राजेशिर्के 
                               |
#रामोजी उर्फ़ #गणोजी राजेशिर्के (एक अपत्य)
        #कान्होजी राजेशिर्के (पाच अपत्य- त्यातील एक पिलाजीराव)
    #पिलाजीराव राजशिर्केे (पाच अपत्य)
1)वाघोजीराव  2)संभाजीराव 3) देवजीराजे
4)गणोजीराव राजेशिर्के-5)जिऊबाई उर्फ येसुबाई (शिवरायांचे जावई)    (संभाजीराजांच्या पत्नी)
           ___________
1 फेब्रुवारी 1689 साली छत्रपती संभाजीराजांच्या अटकेनंतर विविध प्रकारे गमिनीकावे व ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर शिर्के घराण्यांची आडनावे बदलली त्यानुसार राजेशिर्के + शिर्के + रिकामे + पडवळ + थिटे + शिवले + कुंभारकर + पापळ सह अन्य इतर ही असंख्य नवीन आडनावे बदलली गेली त्यानंतर कोकण , शिरकाण प्रदेश, संगमेश्वर, पेडगाव, बहादुरगड, श्रीगोंदा, तुळापुर, वढु बुद्रुक, सह इतर भागात आणि अखंड महाराष्ट्रसह इतर राज्यात देशात विदेशात शिर्के मंडळी विखुरली गेल्याने विविध भागात विस्तारली गेली आहेत..!

*वरील ऐतिहासिक आडनावांच्या अनेक घरांपैकी काही प्रमुख मोजकी प्रत्यक्षदर्शी शिर्के घराणी खालील प्रमाणे आढळतात.*

👉संपूर्ण कोकण, शिरकाण प्रदेश, संगमेश्वर, शृंगारपुर सह इतर भागात लाखो राजेशिर्के घराणे आताही आहेत/ पूर्वीही होती त्यातीलच राजधानी सातारा येथील माजी उपनगराध्यक्ष मा. सुहासजी राजेशिर्के, पुणे येथील अमितजी राजेशिर्के , मुंबईचे निशांतजी राजेशिर्के, सातारचे सुरेशजी शिर्के सह अन्य शिर्के मंडळी आहेत.
वाई जवळील पसरणीचे प्रसिद्ध उद्योगपती कै.'बी.जी.शिर्के' यांचे पूर्वी 'रिकामे' असे आड़नाव होते परंतु स्वतः बी.जी. शिर्के यांनी आपले आडनाव बदलून घेत पुन्हा शिर्के करुन घेतल्याने हे घराणेही वंशज आहेत त्यांची एक आठवण नेहमी स्मरणात राहील ती म्हणजे "शिवप्रताप दिना" निमित्त त्यांनी अनेक वेळा किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांच्या मूर्तिवर स्व-मालकीच्या हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टि केली होती.
छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर येथे कैद केल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका- श्रीगोंदा येथील मौजे पेड़गाव गावातील बहादुरगडावर (नविन नाव धर्मवीरगड ) आणले असता, रस्ताने छत्रपती शंभुराजांना वाचविण्यासाठी( शोधण्याकामी) मागावर असणारे राजेशिर्के मंडळी बहादुरगड परिसरात आले होते त्यांचेच वंशज म्हणजे शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा. दिपकजी गणपतराव शिर्के व इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के सह त्यांचे खुप मोठे शिर्के घराणे आजही बहादुरगड तटबंदी लगत राहत असल्याने हे शिर्के घराणे शंभुराजांना वाचविण्यासाठी बहादुरगडाच्या (धर्मवीरगड) तटबंदी पर्यंत आले होते हा भक्कम पुरावा असून त्यातील काही शिर्के थेट गडामध्ये प्रवेश करत असताना पाखल्याच्या वेशांतरात प्रवेशद्वारातच पकडले गेल्याने त्यांच्या कत्तलीही झाल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच काही शिर्के मंडळी गुप्तपणे संभाजीराजांपर्यंत गडावर पोहचत, महाराणी येसुबाईंनी दिलेली महत्त्वाची माहिती देत, शंभुराजांनीही काही गुप्तहेरा मार्फत निरोप- बातमी व लिखित महत्वाचे खलीदे दिल्याची इतिहासात नोंद आढळते.त्याच शिर्के घराण्याचे वंशज आजही बहादुरगड परिसरात जीवन जगताना दिसत आहे.
सातारा, कोल्हापुर, तंजावर येथील राजगादीचे वंशज छत्रपती भोसले घराण्याचे अनेक नातेवाईक व सगे-सोयरे मंडळी हे आजही शिर्के घराण्यातील आहेत.
   ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'थिटे' असे पडले त्यापैकी एक प्रमुख वंशज घराणे म्हणजे माजी खासदार, माजी मंत्री.कै. बापूसाहेब थिटे यांचे होय.
    वाई जवळील पसरणीचे भूमिपत्र व प्रसिद्ध वृत्तपत्र "पवनेच्या प्रवाह" चे  संपादक व इतिहास अभ्यासक, लेखक मा.शिवाजीराव अमृतराव शिर्के, पैठण येथील रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के, नागपुर सह अनेक जिल्ह्यातही शिर्के घराणी 1869 नंतरच विस्तारली आहेत.
  अ.नगर जिल्हा, श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादुरगडापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर संपूर्ण गावच शिर्के घराण्याची वसलेली दिसत आहेत ( 1689 च्या काळातील शिर्के सैनिकांच्या छावण्या होत्या.)
कोकणातील संगमेश्वर ते पेडगांवचा किल्ले बहादुरगड या मार्गावरील अनेक गावात ठिकठिकाणी शिर्के घराणी रहीवाशी झालेले आढळतात. ( शंभुराजांबाबत गुप्त माहिती वेगात मिळविण्याकामी ही मंडळी त्यामार्गात आलेली होती अनं तशीच कायमची स्थायिक झाली. )
  ज्या शिर्के मंडळींचे आडनाव 'पडवळ' असे पडले आहे त्यातील अनेक शिर्के लोक पानशेत धरणा लगत मौजे शिरकोली, तालुका- वेल्हे, जिल्हा पुणे येथेही राहतात त्यातील एक घर 'शिरकाई देवीच्या मंदिरात पुजारी' म्हणून काम पाहतात तर काही पडवळ शिरकाई देवी ट्रस्ट मधे पदाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.
  डेरवण येथील शिवसृष्टी चे व्यवस्थापक आबासाहेब शिर्के सह इतर अन्य मराठा संघटनेचे मंडळी ही शिर्केचे वंशज आहेत.
ज्या शिर्के मंडळींचे आडनाव कुंभारकर असे पडले ते लोक तालुका- पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, सासवड, वनपुरी या भागात राहत असून त्यांचे अडनाव जातीवाचक असले तरी त्यांची ज़ात मराठाच आहे हे विशेष होय, त्यापैकी अनेक कुंभारकर मंडळींनी आपले आडनाव बदलून पूर्ववत शिर्के केली आहेत तर काही मंडळी आजही कुंभारकर आडनाव आभिमानाने लावत आहेत त्यापैकीच एक नाव वनपुरीचे राहुल कुंभारकर सह इतरही अन्य भरपूर घरे आहेत ती मंडळीही अडनाव बदलण्याच्या तयारीत आहेत.
  तसेच तुळापूर, वढु बुद्रुक येथील अनेक शिर्के मंडळींचे आडनाव 'वेचले' आणि 'शिवले' अशी झाली असून हा इतिहास अनेक लोकानां माहित आहे याचेही पुरावे प्रत्यक्ष पाहायला मिळतात.
   1689 च्या घटनेनंतर कोकणातील समस्त शिर्के घराणे वैयक्तिक कामानिमित्त,जीवन जगण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रासह, बाहेरील राज्यात- बडोदे व देश-विदेशात स्थलांतरित झालेले दिसतात.
  तसेच 2 फेब्रुवारी 1689 पूर्वी शिर्के आडनाव हे फक्त मराठा घराण्यातच असताना 1689 नंतर मात्र शिर्के हे आडनाव अनेक जातीत आढळले जाते त्या घराण्यांचा ही तर्कशास्त्रानुसार आभ्यास करावा लागेल. ( त्याप्रसंगी अनेक शिर्के लोकांनी गामिनी कावा करत थेट जातीवर्णीय व्यावसायिक वेशांतर करुन मोघलांच्या छावणीत नाभिक, गुरव, पुजारी, पालखीचे भोई, पखाल्या, कुंभार,आदि अनेक वेशांतरे घेतली असावीत. ( ऐतिहासिक तर्कशास्त्रनुसार )

👍येसुबाईंच्या नामकरणाचा इतिहास:-
     पूर्वीच्या काळी पुरुषप्रधान सत्ता परंपरा असल्याने वंशावळी दर्शीवताना महिलांचा उल्लेख आढळत नाही परंतु एका माहितीनुसार असे समजते की, श्रीमंत पिलाजीराव शिर्के यांच्या कन्येचे नाव स्वताःच्या आईच्या नावाची म्हणजे पिलाजीरावांच्या मातोश्री जिऊसाहेब शिर्के यांच्या आठवणीच्या स्मरणार्थ आपल्या लेकिचे नामकरण "जिऊ" असे केले होते म्हणूनच येसुबाईंचे माहेर कडील नाव "जिऊबाई" असे होते परंतु शंभुराजांशी विवाह झाल्यानंतर आशीर्वाद देतानाच राजमाता जिजाऊ यांनी "येसूबाई" असे नामकरण केले होते ही एक महत्वाची ऐतिहासिक बाब म्हणावी लागेल.
         या सर्व माहिती वरुन एकच सिद्ध होते की, संभाजीराजांचे सख्खे मेहुणे गणोजीराजे शिर्के, त्यांचे इतर तिन्ही बंधु, गणोजी राजांच्या पत्नी (शंभुराजांच्या बहिण), सासरे पिलाजीराव शिर्के यांनी शेवट पर्यंत संभाजीराजांना वाचविण्यासाठी मोगलांविरुद्ध प्रतिकार करुन मोठी पराकाष्ठा केली असल्याचा हा प्रबळ पुरावाच आहे आणि विशेष म्हणजे राजेशिर्के घराण्यांचा महाराष्ट्रातील साधारणता 1500 वर्षा पासूनचा कणखर इतिहास पहिला तर त्यातील सुमारे 500 वर्ष शिर्के हे रायगडचे सत्ताधीश (स्वामी) होते म्हणजेच शिर्के घराण्यांची रायगडावर राजसत्ता होती तसेच इतक्या वर्षापासून राजेशिर्के कधीही धर्मांतर करुन मुसलमान झालेले इतिहासात उल्लेख अथवा संदर्भ आढळत नाहीत,यावरून राजेशिर्के घराणे किती हिंदुधर्म स्वाभामिनी होते हा पुरावाही निष्ठावंत असण्यासाठी महत्वाचा ठरत आहे.
छत्रपती शिवरायांची एक पत्नी शिर्के घराण्यातील होत्या, संभाजीराजांच्या पत्नीही शिर्के घराण्यातील होत्या, एवढेच नाही तर शंभुराजांच्या बलिदाना नंतर ही शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहूराजे यांची पत्नी ही शिर्के घराण्यातीलच होत्या इतकेच काय तर त्यानंतरही अनेक पिढ्या भोसले + शिर्के सोयरिकी झाल्या असल्याचे भक्कम पुरावे आहेत. शिवाय माहिती अधिकारात महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख खात्यानेही गणोजीराजे शिर्के यांच्या बाबत निर्दोष पत्र जाहिर केले आहे म्हणूनच गणोजीराजे,
पिलाजीराजेसह त्यांचे सर्व बंधु व समस्त शिर्के घराणे निर्दोष असून ते कट्टर स्वराज्यनिष्ठच असल्याचे सबळ पुराव्यानुसार निष्पन्न होत आहे..!

जय शंभुराजे..!
जय येसूबाई..!
जय गणोजीराजे..!
जय पिलाजीराजे..!
जय शंभुसेना..!

-: लेखक :- 
लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के
एम.ए.बी.एड (इतिहास)इतिहास अभ्यासक,
  मार्गदर्शक, शंभुसेना संघटना 
रा:- किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड) मौजे पेडगाव, तालुका- श्रीगोंदा,जिल्हा- अहमदनगर

Post a Comment

0 Comments