Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी अटक ; एलसीबी व श्रीगोंदा पोलिसांची संयुक्त कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टची बेलवंडी बु।। व लोणी व्यंकनाथ येथील ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीस पकडण्यास एलसीबी व श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. अन्सार मुनीर शेख असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी माळीवाडा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, आरोपी शेख याचा शोध घेऊन पकडण्यात आले. ही कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या व श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments