Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाशिवरात्री महोत्सव सुरू ; माधवानंद महाराजांच्या शोभा यात्रेने प्रारंभ


२० बाय १५० स्टेज तयार केले असून ज्ञानेश्वर, माधवानंद महाराज, शिवशंकर, वामनानंद स्वामी महाराज, गणपती यांच्या ठेवल्या प्रतिमा
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे (उमरखेड) मठाधिपती प.पू. माधवानंद गुरू वामनानंद स्वामी यांचा महाशिवरात्री महोत्सव प्रथमच अहमदनगर शहरात कल्याण रोडवरील व्दारका लॉन या कार्यालयात होत आहे. प्रथमत माळीवाडा येथील श्री विशाल गणपतीची श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे (उमरखेड) मठाधिपती प.पू. माधवानंद गुरू वामनानंद स्वामी यांचा हस्ते आरती करण्यात आली. यावेळी टस्टचे अध्यक्ष अँँड. अभय आगरकर, चंद्रकांत फुलारी, रामकृष्ण राउत,गजानन ससे, संदीप कुलकर्णी व श्री सदगुरू वामनानंद महाराज भक्त मंडळ अहमदनगरचे सर्व साधक, भास्करराव जोशी, सुधाकर मातोरीकर, कांतागुरू कापरे, चकोरशास्त्री मुळे, बबनराव अदवंत, डॉ.वैजनाथ देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
शोभायात्रेत उंट,घोडे,बॅड,तुतारी, तसेच चिमकुल्या मुलीच्या हातात भगवा ध्वज,डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या महिला,महिलांनी पारंपारीक वेशभूषा केली होती.नाकात नथ, नउवारी साडी तर पुरूषांनी पांढरा कुर्ता, पायजमा असा पारंपारीक वेष परीधान केला होता.महिला व पुरूषांनी यावेळी फुगडया खेळल्या. बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भजनी मंडळ सहभागी झाले होते. प.पू. माधवानंद गुरू वामनानंद स्वामी यांची शोभायात्रा श्री आराधना ज्ञानपीठ वे. मु. श्री. कांबळे गुरूजी यांचे रेणुका देवी मंदिर ते कल्याण रोडवरील व्दारका लॉन या मार्गे प्रसिध्द सनई वादक प्रकाश राउत यांच्या मार्गदशनाखाली रथामधून काढण्यात आली. प.पू. माधवानंद गुरू वामनानंद स्वामी यांचे औक्षण सौ. अनुजा कुलकर्णी,मनिषा जोशी,सौ. देशपांडे,अर्पणा कुलकर्णी यांनी केले. व्दारका लॉन येथे २० बाय १५० स्टेज तयार केले असून ज्ञानेश्वर,माधवानंद महाराज,शिवशंकर,वामनानंद स्वामी महाराज,गणपती यांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत. शोभायात्रेनंतर सांयकाळी ७ ते ८ या वेळेत श्री विश्वंभर प्रदोषपूजनाचा कार्यक्रम झाला.या प्रदोषपूजेचे यजमान प्रकाश दिंगबर देवळालीकर व डॉ.वैजनाथ मुरलीधर देशमुख यांनी सपत्नीक पूजा केली.रात्री ८ वाजता श्री विश्वंभर लिंग दशन देण्यात आले. मराठवाडा येथील तसेच सेलू,अंबाजोगाई,उस्मानाबाद आदी ठिकाणाहून भक्तगण आले आहेत.महाशिवरात्रीसाठी सकाळी ७ ते ६ वाजता भक्तासाठी खास मोफत रिक्षेची व्यवस्था केली आहे.मोठया संख्येने भाविक भक्तानी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने केले आहे.

Post a Comment

0 Comments