Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारला सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्साहात

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
 भिंगार - सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. विजय नगर येथून शोभा यात्रसेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सर्व समाजबांधवांनी भगवे फेटे परिधान केले होते. शोभायात्रेमध्ये ढोल पथक, बँण्ड महत्वाचे आकर्षण व लहान मुलांचे लेझीम पथकं मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यामध्ये भगवे ध्वज तसेच भगवे फेट्यामुळे मिरवणुकीची शोभा वाढत होती मिरवणूक विजयलाईन मार्गे, आंबेडकर वेस येथून खळेवाडी, नेहरू चूक मार्गे जाऊन पंचाच्या वाड्या मध्ये येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली, त्यानंतर सर्व समाज बांधवान साठी जेवणाची व्यस्था करण्यात आली होती तसेच संध्याकाळी ही शिवजन्माचा कार्यक्रम करण्यात आला, या कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष राहुल पानसरे, अरुण चव्हाण, संजय कापसे, गणेश सातकर, किरण फटांगरे, अजय सपकाळ, संजय सपकाळ, अमोल वाघस्कर, अविनाश लांडगे, श्याम वाघस्कर, निलेश बेरड तसेच सकल मराठा समाजबांधवांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments