Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संजीवनीगड येथे बारा ज्योतिर्लिंग मंदिर शिलान्यास पूजनआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर तालुक्यातील मेहकरी जवळील संजीवनीगड ( सोनेवाडी पिंपळगाव लांडगा )येथे बारा ज्योतिर्लिंग मंदिर शिलान्यास पूजन व शनिवार दि. २२ पर्यंत शिवभक्ती याग रुद्र स्वाहाकार महंत श्री शंकर भारती गुरु कुशाल भारती यांच्या हस्ते होणार आहे.
शुक्रवार दि. २१ला रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर श्री द्वादश ज्योतिर्लिंग शिवालय मंदिर पूजन आद्य गुरु शंकराचार्य( करवीर पीठ ,कोल्हापूर ) सभापती उमाशंकर भारती,पंचदशनाम जुना आखाडा ), सभापती महंत प्रेमगिरीजी ,महंत राजेंद्रगिरी महाराज, संतोषगिरी महाराज ,काशिनाथ महाराज( पंचगाव ) यांच्या हस्ते होणार आहे. शनिवार दि. २२ ला यज्ञाची पूर्ण आहुती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. पंचक्रोशीतील भक्तजनांना व दात्यांना आग्रहाचे निमंत्रण व आपणा सर्वांच्या सहकार्याने संकल्प पूर्णत्वास जाणार आहे कीर्तन, भजन ,काकडा हरिपाठ, विना वादन ,संगीत गायन ,कार्यक्रम गेल्या १०फेब्रुवारी पासून सुरु आहेत . सर्व पंचकोशी सद्गुरु संजीवनी गड ,सोनेवाडी ,पिंपळगाव लांडगा सर्व ब्रह्मवृंद पुरोहित बबन देवा,तुंगार वेदमूर्ती राजेंद्र जावळे गुरुजी ,वेदमूर्ती अनिकेत मुळे,वेदमूर्ती उमेश जोशी,वेद नारायण सुहास मुळे, वेद नारायण अनंत जोशी, वेद नारायण,यांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती महंत शंकर महाराज भारती यांनी दिली .

Post a Comment

0 Comments