Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ सोलापूरला रवाना


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे, दि.२०: सोलापूर येथे दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथून सोलापूरला रवाना झाला. या संघात सुमारे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी खेळाडूंचा समावेश आहे. 
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुणे जिल्ह्याच्या संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भानुदास गायकवाड, श्रीमंत पाटोळे, रेश्मा माळी तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सर्व क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक असे प्रकार आहेत. तसेच इनडोअर आणि आउटडोअर अशा स्पर्धा होणार आहेत. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, थ्रो बॉल, रिंग टेनिस इत्यादी क्रीडा प्रकार आहेत. तर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, १०० by ४०० मीटर रिले, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, इत्यादी क्रीडाप्रकार पुरुष गट व महिला गट या दोन गटांमध्ये खेळले जाणार आहेत. तसेच टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी क्रीडाप्रकार महिला व पुरुष गटामध्ये तसेच 45 वर्षावरील व 45 वर्षाखालील अशा दोन प्रकारात खेळले जाणार आहेत.
याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा यादरम्यान आयोजित केल्या जात आहेत. पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून प्रत्येक जिल्ह्यातील जवळपास दोनशे ते अडीचशे खेळाडूंचा संघ स्पर्धेत सहभागी होतो. यामधून एका जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप त्यानंतर द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक असे क्रमांक दरवर्षी काढले जातात. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी केली जाते.

Post a Comment

0 Comments