Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आत्मा मलिक कॅरिअर अकॅडमी विद्यार्थ्यांकडून श्री साई अनाथाल्यातील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप


 आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सावळीविहिर - शिवजयंतीनिमित्त निघोज निमगाव येथील श्री साई अनाथाल्यातील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करत एक आगळी वेगळी शिवजयंतीनिमित्ताने आत्मा मलिक कॅरिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली.
श्री जंगली महाराज आश्रमा जवळील आत्मा मलिक कॅरिअर अकॅडमीत एम, पी ,एस, सी व यू,पी एस,सी अभ्यासक्रमासाठी आलेल्या सुमारे 110 विद्यार्थ्यांनी आपल्या खर्चातून आपआपसात वर्गणी गोळा करून व मिठाई घेऊन येथून जवळच असलेल्या निघोज येथील साई अनाथालयात शिवजयंती दिनी सकाळी जाऊन तेथील अनाथ मुलांना खाऊ व विविध मिठाईचे वाटप केले, तसेच त्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास सोप्या व साध्या भाषेत समजावून सांगितला. त्यांना आपुलकीने जवळ घेत त्यांच्याशी हितगुज साधली.
त्यानंतर या अकादमीतील विद्यार्थ्यांनी सावळीविहीर बुद्रुक येथे येऊन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करुन छत्रपतींचा जय जयकार करत त्यांना मानवंदना दिली. यावेळी त्यांचे गणेश आगलावे, दिनेश आरणे, शांताराम जपे, शिवाजी आगलावे ,पत्रकार राजेंद्र दुनबंळे, राजेंद्र गडकरी, अमोल वाघमारे, अशोक दुशिंग आदींनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या या शिवजयंती दिनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

Post a Comment

0 Comments