Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर परिसरात शिवजयंती उत्साहातआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - सावळीविहीर व परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली,
शिवजयंतीनिमित्त सावळीविहीर बु ।।येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पूर्णाकृती पुतळ्या समोर आकर्षक मंडप ,भगवे ध्वज आकर्षक रांगोळ्या व विद्युत रोशनाई करण्यात आली होती, शिवजयंतीदिनी सकाळी सावळीविहीर बुद्रुक च्या सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे उपसरपंच वृषाली ओमेश जपे पोलीस पाटील सौ संगीता सुरेश वाघमारे यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवरायांच्या येथील अर्थपूर्ण कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ,श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले, त्यानंतर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे, माजी सभापती जिजाबा आगलावे, ,शांताराम जपे, शिवाजी आगलावे ,माजी सरपंच सोपान पवार, गणेश आगलावे आशिष आगलावे, राजेंद्र गडकरी शिवसेना शाखाप्रमुख दिनेश आरणे ,भाजयु मोर्चाचे रावसाहेब एखंडे, कैलास सदाफळ, दिलीप बाठिया, विनायक आगलावे, संजय जपे आदींनी छत्रपती शिवऱायांचे पूजन केले ,त्यानंतर विविध संघटना व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने ही छत्रपतींना अभिवादन करण्यात आले, यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली,

यावेळी दोन छोट्या मुलींनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची ची थोडक्यात उपस्थितांसमोर माहिती सांगत त्यांच्या कार्याचे मोठे कौतुक केले, या कार्यक्रमाला चंद्रकांत जपे, नितीन बाराहाते, गणेश कापसे रवी कापसे ,सुनील जपे ,विकास जपे ,दया बोर्डे ,भास्कर वाघमारे संतोष पळसे नितीन आगलावे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक ग्रामस्थ ,ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सावळविहीर परिसरातही विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सावळीविहीर व परिसरात सर्वत्र भगवेमय वातावरण व छत्रपतींचा जयजयकार बघायला मिळत होता, विविध ठिकाणी छत्रपतींना मानवंदना देणारे विविध फ्लेक्स बोर्ड झळकत होते तसेच स्पीकरवर पोवाडे ,छत्रपतींचे गीते दिवसभर ऐकायला मिळत होती, काही ठिकाणी छत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली होती, शिर्डी पो स्टे चे हे,कॉ, बर्डे ,गंगिरे व सहकाऱ्यांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला.

Post a Comment

0 Comments