Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवजयंतीचे औचित्य साधून पत्रकार अन्सार शेख, तुकाराम कामठे व साबळे यांचा सन्मान


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जय जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता २०२० हा पुरस्काराचे मानकरी नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे व दैनिक नगरी दंवडीचे नगर तालुका प्रतिनिधी अन्सार शेख, अहमदनगर घडामोडी चे नगर तालुका प्रतिनिधी तुकाराम कामठे व दैनिक लोकमतचे प्रतिनिधी खासदार साबळे ठरले.
या कार्यक्रमाचे वितरण शिवजयंतीचे औचित्य साधत नवनागापुर येथे करण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक कार्यात तसेच कलाक्षेत्रात व व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा मोठा वाटा असतो. ही संकल्पना राबवत प्रतिष्ठानच्या वतीने सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सहपत्नीक सन्मान पुरस्काराचे आयोजन प्रतिष्ठानने केले होते.
.पुरस्काराबाबत , महाराष्ट्र जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, शहराध्यक्ष भारत पवार, रियाज पठाण, अशोक तांबे ,रवी कदम,निलेश आगरकर,रफीक शेख, सोहेल मणियार,साबील सय्यद जयसिंग यादव,विजय गोबरे, श्याम कांबळे, सचिन मोकळ, कैलास धनवटे, शिवा मस्के आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments