Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तेलंगणा सरकारच्या वतीने स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांचा सन्मान

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कोपरगाव - गोदावरी नदीच्या पात्रातील स्वच्छतेसाठी नेहमीच पुढकार घेणारे स्वच्छतादूत ओळखले जाणारे आदिनाथ ढाकणे यांच्या कार्याची तेलगंण सरकारने दखल घेतली आहे. तेलगंण येथील वाँटर बोर्डाचे चेअरमन प्रकाशराव यांनी ढाकणे यांच्या गोदावरी स्वच्छतेच्या कार्याबद्दल कौतुक केले. तसेच तेलगंण सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील स्वच्छतादूत म्हणून आदिनाथ ढाकणे यांचा स्मृती चिन्ह व शाल देऊन भव्य सत्कार करण्यात आला. ढाकणे यांच्या कार्याची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे. यामुळे ढाकणे याचे महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.


Post a Comment

0 Comments