Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विनायकराव निकाळे यांचा गौरव सोहळा उत्साहात


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहाता - विनायकराव निकाळे ( भाऊ ) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.नलिनीताई यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मा.विनायकराव निकाळे राज्यस्तरीय गौरव समिती पनवेल, नवीमुंबई  यांचेवतीने राहाता येथील संत शिरोमणी सांवता महाराज मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँँड. मानवेंद्र वैदु यांनी केले. तर किशोरभाऊ बोरावके यांनी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकरराव थोरात हे होते. गौरवसमितीच्या वतीने विनायकभाऊंचा सपत्नीक मुख्य सत्कार समतावादी, बहुजन जेष्ठ नेते बाळासाहेब कर्डक व त्यांच्या पत्नी सौ.कविताताई कर्डक तसेच विरोधी पक्षनेत्या महानगरपालिका नाशिक यांचे हस्ते करण्यात आला. 
विनायक भाऊ निकाळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, पत्नी सौ.नलिनीताई, मुले, मुलगी , आई, वडील, भाऊ आणि बहिणी , नातेवाईक, शेतमजूर, शेतकरी, रोह्योमजुर , हजेरी सहाय्यक, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मार्गदरशन केले , विशेषतः वडिल स्मृतीशेष मारूतीराव (दादा) , चळवळीतील मार्गदर्शक फकिरचंद पिपाडा, एम. एस.सय्यदसर, युवक युवती , ज्ञात अज्ञात सहकारी यांचा हा सन्मान आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे.याचवेळी जेष्ठ कार्यकर्त्यांच्या सूचनेला तात्काळ संमती देवून मरणोत्त दृष्टीदान करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
" आपल्या जगण्याचा आधार" " भारतीय संविधान" या विषयावर अँँड. संभाजीराव बोरूडे यांचे व्याख्यान झाले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मधुकर थोरात म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील अनैक सामाजिक कार्यकर्ते यांच्या जीवनाचा अभ्यास केला.तेव्हा आम्हाला विनायकभाऊ ह्या एकमेव व्यक्ती मिळाल्या.तेव्हा आम्ही विनायकभाऊंचा गौरव करण्याचे ठरविले. १५ डिसेंबर भाऊंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर शुभेच्छांचा पाऊस सोशियलमिडियावर पडत होता. त्यातील भाऊंना शुभेच्छा देणारांकडे गौरव करण्याची कल्पना मांडली. ती अनेकांना आवडल्याने राज्यस्तरीय गौरव समिती निर्माण झाली. भाऊंना गौरव निधी द्यावा यासाठी बॅक खाते नंबरही दिला.पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परंतु हा भव्य नागरी सत्काराचे आयोजन पहाता भाऊ तर हे तर स्वतः करू शकत नाही. ते तर फकिर माणूस. त्यांच्याकडे आजारपणात मेडिसीनला पैसे नसतात हे मला ठाऊक आहे. पण आजची व्यवस्था पाहिल्यावर भाऊंवर प्रेम करणारा व कोठेही नांवाचा उल्लेख न करणारा फार मोठा मित्र परिवार पाहिल्यावर आम्ही भाऊंची योग्य निवड केली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
या कार्यक्रमासाठी रविंद्र डांगे ( AICAF)आपल्या विदर्भ व मराठवाडय़ातील कार्यकर्तेसह तसेच प्रकाशभाऊ शिंदे. पुणे, वनकामगारांसह उपस्थित होते. अनिलभाऊ म्हात्रे मुंबई हे आपल्या प्रमुख कार्यकर्तेसह उपस्थित होते. बामसेफ , भारतमुक्ती मोर्चा विद्रोही चळवळ , श्रमिक मुक्ती दल व सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाऊसाहेब वाघमारे, किशोरभाऊ बोरावके , सुरेश पानसरे, अॅड.अनिल शेजवळ , डाॅ.संभाजीराव डांगे, प्रा.पुरूषोत्तम पगारे , मामा गवारे , डाॅ. एम. वाय .देशमुख, कानिफनाथ तांबे, राजमहंमद शेख , अनिलभाऊ सोमवंशी , बिलाल इनामदार, मिलिंद गांधी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments