Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थी प्रतिनिधी तसेच जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर :(अन्सार शेख)
नगर तालुक्यातील मदडगाव येथील राजलक्ष्मी फौंडेशन यांच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय कॉलेज मध्ये 250 विद्यार्थीयांनी ठिय्या आंदोलन केले. जो पर्यंत संस्थापक अध्यक्ष येत नाहीत तो पर्यंत हलणार नाही.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मदडगाव, अहमदनगर येथील विद्यार्थी असुन महाविद्यालयात प्रशासनाकडून विद्यर्थांवर अन्याय केला जातो. विद्यार्थ्यांनी पेपर लिहून सुध्दा त्यांना त्यांच्या हक्काचे गुण दिले जात नाहीत त्यामुळे आज विद्यार्थी नापास झालेले आहेत . मागण्या पुर्ण न केल्यामुळे विद्यार्थीयांनी बेमुदत आंदोलन पुकारले . जो पर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन असेच चालू राहिल यावर विद्यार्थी ठाम आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या प्राचार्य बदलून हवे आहेत,महाविद्यालयामध्ये प्रक्टिकलसाठी लागणारे उपयुक्त संशोधने व केमिकल नाहीत व वेळेवर प्रक्टिकल होत नाही, विषयांचे शिक्षक नसताना पेपर देऊनही मुलांनी युनिव्हर्सिटी मध्ये मार्क्स पण कॉलेजने टार्गेट करून मुलांना प्रक्टिकल मध्ये नापास केले,मन मर्जिशिवाय व विद्यापीठाच्या नियमांच्या बाहेर जाऊन बाँन्ड तयार करून घेतले, प्राचार्य मानसिक त्रास देतात, विद्यापीठाची परवानगी नसताना हि विद्यार्थ्यांस चार महिने निलंबित करण्यात आले,मुलींचे होस्टेल नाही, विद्यार्थ्यांनी विषायांतर्गत प्रश्न विचारल्यास त्यांना शिक्षा केली जाते,दोन मिनिटे उशिर झाला तरी दहा रूपये दंड वसूल केला जातो,अनुभवी शिक्षक नाहीत असे अनेक प्रश्न घेउन विद्यार्थी यांनी हे आंदोलन पुकारले आहे.
या वेळी सुमारे 250 विद्यार्थी या आंदोलन सहभागी झाले होते जनाधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे व प्रहार जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला

Post a Comment

0 Comments