Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहरातील खड्डे बुजविणार्‍या कामगारांचा सत्कार


दिल्लीगेट ते पत्रकार चौकातील रस्त्याचे पॅचिंगचे काम सुरु ; फिनिक्स व पिपल्स हेल्पलाईनच्या आंदोलनाला यश
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - फिनिक्स सोशल फाऊंडेशन व पिपल्स हेल्पलाईनने शहर खड्डेमुक्तीचा नारा देत गांधीगिरी पध्दतीने सत्याग्रह केला होता. याआंदोलनास यश आले असून, पत्रकार चौकासह दिल्लीगेट येथील रस्त्याचे पॅचिंग करुन खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्डे बुजविणार्‍या कामगारांचा चक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला आणि मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी यांचे आभार मानले. 
शहरात व पत्रकार चौक येथे असलेल्या रस्त्यावरील खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. खड्डे बुजविण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशन व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने पत्रकार चौकात आंदोलन करुन रास्ता रोकोचा इशारा दिला होता. याची दखल घेत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने संघटनेने प्रशासनाचे आभार मानत कामगारांचा सत्कार केला. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, मिराबाई कनगर, आशाबाई भारस्कर, अंबिका जाधव, संगीता साळुंके, शारदा जंगम, वैशाली शिंदे, अशोक भोसले, नामदेव अडागळे, पोपट भोसले, अमजद बागवान, सुशिला देशमुख आदी उपस्थित होते. 
शहरामध्ये असलेले रस्त्यावरील खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत असून, यामुळे मागील महिन्यात अनेक व्यक्तींचा बळी गेला. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. नागरिकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या प्रश्‍नांची मनपा व जिल्हा प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन ते प्रश्‍न तातडीने सोडविले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना आंदोलनाची वेळ येऊ नये ही अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments