Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिराळ चिचोंडी शाखेने केली माजी सैनिकांची पेन्शन बंद


जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने बँकेच्या मुख्य शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा
माजी सैनिकांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही -शिवाजी पालवे
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिराळ चिचोंडी शाखेने केली माजी सैनिकांची पेन्शन बंद - सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिराळ चिचोंडी शाखेतील 49 माजी सैनिकांची पेन्शन बंद झाल्याने त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. माजी सैनिकांचा उदर निर्वाह चालण्यासाठी तातडीने त्यांची थकित पेन्शन देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने बँकेच्या नगर मधील मुख्य शाखेत देण्यात आले आहे. अन्यथा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक फाऊंडेशनच्या माध्यमातून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी साहेबराव गिते, बाबासाहेब आव्हाड, भास्कर गर्जे, रणजित मिल्के, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, दिगंबर शेळके, जगन्नाथ जावळे, संभाजी वांढेकर, संतोष मगर आदी उपस्थित होते.
शिराळ चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील 49 माजी सैनिकांचे दोन महिन्यापासून पेन्शन बंद करण्यात आली आहे. माजी सैनिकांनी हयातीचे दाखले सदर शाखे मध्ये नोव्हेंबर मध्येच जमा केले. मात्र बँकेच्या संबंधीत कर्मचार्‍यांनी ते दाखले अपलोड केले नसल्याने माजी सैनिकांची पेन्शन बंद झाली आहे. बँक प्रशासनाच्या चुकीमुळे माजी सैनिकांना त्रास सहन करावा लागत असून, या महिन्यात 29 फेब्रुवारीच्या अगोदर पेन्शन अदा न झाल्यास जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सैनिक हा देशाचा सन्मान असून, सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान झालाच पाहिजे. माजी सैनिकांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याची भावना फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments