Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ट्रक-बोलोरोचा भीषण अपघात, एक ठार ; अपघातात वडगाव (ता.पाथर्डी) येथीलाचा समावेशआँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील सात ते आठजण देवदर्शनासाठी जात असणाऱ्या बोलेरो गाडी व ट्रकाचा रत्नागिरी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात राजापूर (ता.कोल्हापूर जि. रत्नागिरी) जवळ घडला असून, एकजण ठार तर अन्यजण जखमी झाले आहेत.

सचिन महादेव बडे हे मयत झाले असून सोमनाथ महादेव बडे, नागनाथ अजिनाथ बडे, अमोल अशोक गरड, भिमराव बाबासाहेब बडे, बाळू धनवे, शुभम सुरेश गरड, संतोष बाबासाहेब बडे, दत्ता सुभाष शेळके ही आठ जखमी असून यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वडगाव येथील ही सर्व तरुण बोलोरो गाडीतून देवदर्शनासाठी गेले होते. Post a Comment

0 Comments