Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फेसबुकवर मैत्री करून फसवणूक करणारा जेरबंद ; सायबर पोलीसांची कारवाईआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून २१ लाख ४१ हजार २७५ रुपयास फसवणूक करणाऱ्यास सायबर पोलीसांनी अटक केली आहे. स्वराज्य मणिकुमार राय (वय ३९, रा.६४ सी, ३ मजला, कष्णानगर, गल्ली नं.२, सफदरजंग एन्क्लेव्ह दक्षिण पश्चिम दिल्ली ११००२९ न्यू दिल्ली, ह.मु.रा.६०, सी/७, तिसरामजला, हुमयाँपूरगाव,) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपी राय याला न्यायालयासमोर उभे केले असता, दि.१७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, डॉ मार्क हँरिल्युम (यु के) व कस्टम आँफिसर महिला, दिल्ली यांनी फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून मोबाईल नंबर घेतला, यानंतर विश्वास संपादन करून मोबाईलवर चँटिंग करून मुलांना लाँपटाँप व मोबाईल गिफ्ट पाठविले, असे सांगून व ते दिल्ली येथे आले आहे. त्यामध्ये ५० पाँऊण्डस स्कँन झाले आहे, असा कस्टम आँफिसर महिलेचा फोन येऊन वेगवेगळे बँक अकौंट नंबर पाठवून त्यावर नमुद प्रमाणे वेगवेगळे चार्ज भरा नाहीतर गुन्हा दाखल होईल, असे धमकावून दोघांनी संगनमताने २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांची फसवणूक केल्याच्या दाखल फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्हाचा तांत्रिक तपास करून न्यू दिल्ली येथे आरोपी राय याला पकडून अधिक चौकशी केली, यात आयसीआयसीआय बँक, नवीदिल्ली येथे कागदपत्रेद्वारे बनावट अकौंट रंजन राय नावाने उघडल्याचे तपासात उघड झाले. तसे चौकशी दरम्यान त्याने कबुली दिली. अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन आरोपी राय याला न्यायालयात हजर केले असता, दि.१७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पो.नि.अरुण परदेशी, पोसई प्रतिक कोळी, पोकाँ अभिजित अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, योगेश गोसावी, वासुदेव शेलार आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments