Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बनावट काँलसेंटर चालवणाऱ्या दोघांना अटक ; नगर सायबर पोलिसांची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - मुंबई येथे बजाज फायनान्स नावाने बनावट काँलसेंटर चालवणाऱ्या दोघांना पकडण्यात नगर सायबर पोलिसांना यश आले आहे. जिशान बक्तीयार शेख (वय ३०, रा.रुम नं.४०४, ए विंग चंद्रेश हिमालय लोढा हेवन मानपाडा, डोंबिवली, मुंबई), अरविंद लक्ष्मण जाधव (वय २९, रा.प्लाँट नं.१९० रुम नं.६०२, बि विंग, पथ्वी हाईटस सेक्ट नं.१९, उलवे नवी मुंबई) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दि.१५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१२ ते दि.२३ जानेवारी दरम्यान मोबाइलवर अमित सिंग व महेश सिंग या नावाने व्यावसायाकरिता बजाज फायनान्स कंपनीमधून लोन देतो, असे सांगून ८८ हजार रुपयांची फसवणुकीची फिर्याद संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील बाळासाहेब विठ्ठल चौधरी यांनी दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तांत्रिक तांत्रिक तपास करुन जिशान शेख, अरविंद जाधव याना पकडण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी करून पोलीस खाकी दाखवताच, चौधरी यांची आर्थिक फसवणूक केल्याची कबुली दिली. आरोपीकडून लँपटाँप, विविध कंपन्याचे ११ मोबाईल, विविध बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.आरोपी शेख हा उच्च शिक्षित असून तो मुळचा आजमगड, उत्तरप्रदेश येथील राहणार आहे.
प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पो.नि.अरुण परदेशी, पो.नि.दिलीप निघोट यांच्या सूचनेनुसार पोसई प्रतिक कोळी, पोहेकाँ योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोना दिगंबर कारखिले, मलिकार्जून बनकर, राहुल हुसळे, पोकाँ अरुण सांगळे, राहुल गुंडू, पोहेकाँ वासुदेव शेलार, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, आणि क्राईम युनिट नं.१ नवीमुंबई वरिष्ठ पो.नि.निकम, स.पो.नि. राख व त्यांच्या पथकातील पोलीसांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments