Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फरारी आरोपी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
अहमदनगर - ३०७, ३५३, ३४ कलमान्वये दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपीस पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. शंकर अशोक पंडित (वय३४, रा.काटवन खंडोबा, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील पुणे बसस्थानक परिसरात ३०७,३५३,३४ कलमान्वये दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी शंकर पंडित येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. उप.नि शिरसाट यांना मिळली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सापळा रचून पोना एस.जी.चव्हाण, गणेश धोत्रे, तागड, पोकाँ एस व्ही वाघेला, सुजय हिवाळे, संदीप थोरात आदिंच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी पंडित याला ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments