Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर बु।। प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहातआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शिर्डी - ये मेरे वतन के लोगो ,साई तुझे देऊळ , बाप्पा मोरया, अशा विविध गीतांनी , नृत्य व विविध विनोदी नाट्यांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा।। जल्लोष चिमुकल्यांचा।। हा सावळीविहीर बुद्रुक प्राथमिक शाळेचा चिमुकल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम उपस्थित प्रेक्षकांना भारावून गेला.
सावळीविहीर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे तसेच केंद्रप्रमुख शिरसागर साहेब शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंधाले साहेब ,माजी सरपंच रमेश आगलावे, माजी उपसरपंच शांताराम जपे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश आरणे यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर गणेश आराधना च्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली छोट्या छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कोळी गीते शेतकरी गीते लावण्या देशभक्तीपर गीते गाऊन व नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या शाळेने नवीन नवीन उपक्रम राबवून तालुक्यातनव्हे तर जिल्ह्यात आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून नावलौकिक कमावला असून या शाळेत नुकताच झालेला सांस्कृतिक कार्यक्रम हा मोठा कौतुकास्पद असल्याचे अनेक प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केले, या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापिका वाणी मॅडम ,पवार मॅडम, तसेच मुख्यत्वेकरून दत्ता गायकवाड सर, दर्शने सर, यांनी मोठे परिश्रम घेतले ,भव्य स्टेज, संगीत आकर्षक विद्युत रोषणाई व मुलांचे नृत्य, गीते, विनोदी नाट्य यामुळे कार्यक्रमाला मोठी रंगत आली, कार्यक्रमासाठी सावळीविहीर परिसरातून मोठ्या संख्येने महिला-पुरुष मुले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments